ब्रिसबेन : कॉमनवेल्थ शुटिंग चॅम्पियनशिपमध्ये १० मीटर एअर पिस्तुलमध्ये सुवर्ण पदक जिंकून हिना सिद्धूनं भारताची शान उंचावलीय. सिद्धूनं ६२६.२ स्कोअर केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाचं म्हणजे हे हिनाचं सलग दुसरं आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक आहे. हिनानं जीतू रायसोबत भारतात आयएसएसएफ वर्ल्डकप फायनलमध्ये १० मीटर एअर पिस्तुल मिश्रित गटात सुवर्ण पदक पटकावलं.


भारताच्या दीपक कुमारनं १० मीटर एअर रायफलमध्ये कांस्यपदक पटकावलं. लंडन ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता गगन नारंग यामध्ये चौथ्या आणि रविकुमार पाचव्या स्थानावर राहिले. नारंगनं क्वालिफिकेशनमध्ये ६२६.२ स्कोअर उभारून कॉमनवेल्थमध्ये रेकॉर्ड बनवला होता.