Indian Team 200 Goal : हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. हॉकी संघानं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं वर्चस्व गाजवलं आहे. असं असताना हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत (Hockey World Cup 2023) भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. यंदा भारतीय संघाचं नेतृत्व हरमनप्रीत सिंह (Harmanpreet Singh) करत आहे. वर्ल्डकप स्पर्धेत भारतासह एकूण 16 संघांचा सहभाग आहे. 1971 पाहून हॉकी वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत हॉकीच्या 14 स्पर्धा झाल्या आहे. यंदा वर्ल्डकप स्पर्धेचं 15 वं पर्व असून भारताकडे यजमानपद आहे. विशेष म्हणजे भारतीय संघ हॉकी वर्ल्डकप स्पर्धेच्या 15 पैकी 15 पर्वात पात्र ठरला आहे. आतापर्यंत झालेल्या 14 पर्वात भारतीय संघाने एकूण 199 गोल झळकावले आहेत. या स्पर्धेत एक गोल झळकावताच भारतीय संघाच्या नावावर एका विक्रमाची नोंद आहे. 200 गोल करणाऱ्या संघाच्या यादीत भारताचा समावेश होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉकी वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने सर्वाधिक 305 गोल, त्यानंतर नेदरलँडनं (Neatherland) 267 गोलची नोंद केली आहे. त्यानंतर 200 गोल करणाऱ्या संघाच्या यादीत भारताला स्थान मिळणार आहे. 200 गोल करणारा संघांमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर असणार आहे. हॉकी वर्ल्डकपच्या (Hockey World Cup) मागच्या 14 पर्वात भारताने एकूण 95 सामने खेळले आहेत त्यात एकूण 199 गोल केले आहेत. या वर्ल्डकपमध्ये एक गोल करताच 200 गोल करणाऱ्या संघांच्या यादीत भारताची नोंद होणार आहे. वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारताचा पहिला सामना स्पेनसोबत असणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजता हा सामना आहे.


बातमी वाचा- Hockey World Cup 2023 स्पर्धेत पाकिस्तान संघ का नाही? चार वेळा जेतेपद जिंकूनही नेमकं काय झालं?


हॉकी वर्ल्डकपमध्ये भारताची कामगिरी


भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेल्या हॉकी वर्ल्डकप स्पर्धेच्या 14 पर्वात सहभाग नोंदवला आहे. भारताने 1975 साली जेतेपदावर नाव कोरलं आहे. तर एकदा उपविजेता आणि एकदा तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लगालं आहे. 1975 पासून आतापर्यंत म्हणजेच 48 वर्षात भारतानं वर्ल्डकप जेतेपद जिंकलेलं नाही. आता विश्वचषक स्पर्धेतील 48 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात येईल अशी आशा आहे. 2021 टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चार दशकांचा दुष्काळ संपवून भारतीय पुरुष हॉकी संघानं कांस्य पदक पटकावलं होतं.