Why Pakistan not playing FIH Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. हॉकी वर्ल्डकप स्पर्धा ओडिशाच्या भुवनेश्वर आणि राउरकेला या दोन शहरांमध्ये होणार आहे. मात्र चारवेळा जेतेपदावर नाव कोरलेला पाकिस्तानी संघ या स्पर्धेत का नाही? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 16 संघ असून भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघ का खेळत नाही? असा प्रश्न विचारला जात आहे. पाकिस्ताननं आतापर्यंत 1971,1978, 1982 आणि 1994 वर्ल्डकप जिंकला आहे. पाकिस्ताननंतर ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँडनं हा किताब 3-3 वेळा जिंकला आहे. जर्मनीने दोनवेळा वर्ल्डकपवर नाव कोरलं आहे. तर भारताने 1975 साली वर्ल्डकप जिंकला आहे. बेल्जियमनं 2018 साली झालेल्या वर्ल्डकपवर नाव कोरलं आहे. असं असताना हॉकी इतिहासात सर्वाधिक विश्वचषकांची नोंद असताना पाकिस्तानी संघाचं नेमकं काय झालं? याबाबक क्रीडाविश्वात चर्चा सुरु आहे.
पाकिस्तान संघ वर्ल्डकप स्पर्धेत पात्र न ठरल्याने खेळत नाही. हो, तुम्ही वाचलं ते खरं आहे. चारवेळा जेतेपद पटकावणारा संघ स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला नाही. वर्ल्डकप स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी पाकिस्तानला 2022 मध्ये आशिया कपच्या टॉप 4 मध्ये स्थान मिळवणं आवश्यक होतं. मात्र स्थान मिळवता आलं आहे. अ गटातील चार संघ तिसऱ्या स्थानापर्यंत होते. त्यामुळे पाकिस्तान संघ पात्र ठरू शकला नाही. यापूर्वी पाकिस्तानी संघ 2014 वर्ल्डकपमध्ये पात्र ठरला नव्हता.
The wait is finally over! It is the opening day of the FIH Odisha Hockey Men's World Cup 2023 and it brings along 4 high-octane clashes. #HWC2023
Which teams do you think will register their first wins today?
Download the https://t.co/igjqkvA4ct app to watch the games LIVE!
— International Hockey Federation (@FIH_Hockey) January 13, 2023
हॉकी आशिया चषक 2022 स्पर्धेत जापान, भारत आणि यजमान इंडोनेशियासह पाकिस्तान संघ ब गटात होते. पाकिस्ताननं भारताविरुद्धचा पहिला सामना 1-1 ने बरोबरीत सोडवला. त्यानंतर इंडोनेशियाला 13-0 ने पराभूत केलं होतं. तर साखळी फेरीत शेवटचा सामना जापानसोबत झाला. मात्र जापानने पाकिस्तानला 2-3 पराभूत केलं. दुसरीकडे भारताने इंडोनेशियाला 16-0 या मोठ्या फरकाने पराभूत केल्यानं सर्व गणित बिघडलं आणि वर्ल्डकप इतिहासात दुसऱ्यांदा पात्र होऊ शकला नाही.
बातमी वाचा- Hockey WC 2023: "भारतीय संघानं पाकिस्तानात पाय ठेवला तर...", हे वक्तव्य आणि झालं असं की...!