Argentina Hockey Olympics heroes Play Another Team: 2018 वर्ल्डकप हॉकी स्पर्धेत अर्जेंटिनाकडून खेळलेले स्टार  खेळाडू गोंजालो पियात आणि  जोक्वेन मेनिनी यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत दुसऱ्या संघांकडून खेळत आहे. ऑलिम्पिक विजेत्या संघात पियात आणि मेनिनीनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत आपला देश बदलणारे पहिलेच खेळाडू ठरले आहेत. मात्र चार वर्षांपूर्वी नेमकं काय झालं होतं की, या दोन खेळाडूंना आपला देश बदलावा लागला, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. चार वर्षापूर्वी म्हणजेच 2018 वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन भुवनेश्वरमध्ये करण्यात आलं होतं. उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाचा सामना इंग्लंडसोबत झाला होता. हा सामना या दोन्ही खेळाडूंसाठी शेवटचा ठरला. पियातने आंतरराष्ट्रीय करिअरमधील 153 सामन्यात 176 गोल केले आहेत. तर स्ट्राईकर जोक्वेन मेनिनी अर्जेंटिनासाठी 110 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. पियात वर्ल्डकपमध्ये जर्मनीकडून, तर मेनिनी स्पेनकडून मैदानात खेळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2018 हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध अर्जेंटिना उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात शेवटच्या मिनिटापर्यंत इंग्लंडने 3-2 अशी आघाडी घेतली होती. तेव्हा स्टार ड्रॅग फ्लिकर खेळाडू गोंजालो पियात यानं हाफ लाइवरून शॉट मारला. मात्र गोल पोस्टजवळ इंग्लिश प्लेअरच्या स्टिकला बॉल लागला आणि गोल हुकला. त्यानंतर सामना संपल्याची शिटी वाजली आणि बरोबरी साधण्याची संधी हुकली. त्यानंतर अर्जेंटिनाला ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या स्टार खेळाडूला डच्चू मिळाला. दुसरीकडे स्ट्राईकर जोक्वेन मेनिनी याचं करिअयर वर्ल्डकपनंतर संपुष्टात आलं. दोघांना तीन वर्षे संघात खेळण्याची संधी मिळाली नाही.


बातमी वाचा- Hockey World Cup 2023 स्पर्धेत पाकिस्तान संघ का नाही? चार वेळा जेतेपद जिंकूनही नेमकं काय झालं?


पियातनं एका वेबसाईटशी बोलताना सांगितलं की, "अर्जेंटिनासाठी हॉकी खेळण्यासाठीचं माझं स्वप्न संपुष्टात आलं. मी हॉकीसाठी जे काही शक्य आहे ते केलं पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. संघ सोडण्यापूर्वी मी असोसिएशन आणि खेळाडूंशी बोललो. पण काहीच बदल झाला नाही."


बातमी वाचा- Hockey WC: भारतीय हॉकी संघानं 1975 साली थेट पंतप्रधान इंदिरा गांधींना दिला इशारा, त्यानंतर झालं असं की...


मेनिनीनं सांगितलं की, "घडामोडी पाहता माझा विचार पक्का झाला होतो की, माझं आंतरराष्ट्रीय करिअर संपुष्टात आलं आहे. मी देशासाठी 8 वर्षे खेळलो होतो. पण हॉकी खेळण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही. मला दुसऱ्या देशाकडू खेळण्याची संधी मिळाली आणि ती मी स्वीकारली."