मुंबई : खेळाडूंचं मानधन वाढावं यासाठी भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि धोनी यांनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली. बीसीसीआयकडूनही या खेळाडूंना सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३० सप्टेंबर २०१७ रोजी भारतीय क्रिकेट टीमच्या खेळाडूंचा बीसीसीआयसोबतचा करार संपला आहे. त्यामुळे नव्यानं करार करण्याआधी बीसीसीआय आणि खेळाडूंमध्ये चर्चा सुरु आहे. काहीच दिवसांपूर्वी आयपीएलचे प्रसारणहक्क स्टारनं विकत घेतले. या लिलावामध्ये बीसीसीआयला मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. हा फायदा खेळाडूंनाही मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


खेळाडूंना मिळते एवढे मानधन


बीसीसीआयशी झालेल्या करारानुसार ग्रेड ए मधल्या खेळाडूंना वर्षाला दोन कोटी रुपये मिळतात. ग्रेड बी मध्ये असलेल्या खेळाडूंना वार्षिक एक कोटी आणि ग्रेड सी मध्ये असलेल्या खेळाडूंना ५० लाख रुपये मिळतात. याशिवाय टेस्टमध्ये पहिल्या ११ खेळाडूंना प्रत्येक मॅचचे १५ लाख रुपये, एका वनडेचे ६ लाख रुपये आणि एका टी-२०चे ३ लाख रुपये मिळतात.


ए ग्रेडमध्ये ७ खेळाडू (२ कोटी रुपये मानधन)


विराट कोहली, धोनी, आर.अश्विन, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, मुरली विजय


बी ग्रेडमध्ये ९ खेळाडू (१ कोटी रुपये मानधन)


रोहित शर्मा, के.एल.राहुल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, वृद्धीमान सहा, जसप्रीत बुमराह, युवराज सिंग


सी ग्रेडमध्ये १५ खेळाडू ( ५० लाख रुपये मानधन)


शिखर धवन, अंबाती रायडू, अमित मिश्रा, मनीष पांडे, अक्सर पटेल, करुण नायर, हार्दिक पांड्या, केदार जाधव, युझुवेंद्र चहल, पार्थिव पटेल, जयंत यादव, मनदीप सिंग, धवल कुलकर्णी, शार्दुल ठाकूर, रिषभ पंत