World Cup 2023 :  वर्ल्ड कप 2023 च्या आठव्या साखळी सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी पराभव केला. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया (Indian Cricket Team) अजूनही अजिंक्य आहे. भारताचे 8 सामन्यांतून 16 गुण आहेत, त्यामुळे गुणतालिकेत संघ पहिल्या स्थानावर विराजमान झालाय. कोलकाताच्या इडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात (IND VS SA) टीम इंडियाच्या फलंदाजांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दरम्यान हा सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये (Dressing Room) आनंदाचं वातावरण आहे. तर भारतीय गोलंदाजांचं जगभरात कौतूक देखील होतंय. मात्र, पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय. अशातच पाकिस्तानचा माजी स्टार गोलंदाज वसीम अक्रम (Wasim Akram) याने एक विधान केलंय. त्यामुळे अनेकांना हसू फुटल्याचं पहायला मिळतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताकडून झालेला पराभव पाकिस्तानच्या जिव्हारी लागलाय. त्यामुळे पाकिस्तानच्या न्यूज चॅनेलवर फक्त आणि फक्त भारताच्या कामगिरीची चर्चा होतीये. काहींनी चर्चा करताना डोक्याला हात लावलाय. तर काहींनी रडगाणं सुरू केलंय. अशातच विश्वचषकात भारतीय संघाला कसं रोखायचं? असा सवाल पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये विचारला जातोय. अशातच जेव्हा हा सवाल पाकिस्तानच्या माजी स्टार गोलंदाजाला म्हणजेच वसीम अक्रमला विचारला गेला. तेव्हा त्याने मजेशीर उत्तर दिलं.


आणखी वाचा - World Cup 2023 : साऊथ अफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाची धमाल! ड्रेसिंग रूममधील Video व्हायरल


पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह-उल-हक,वसीम अक्रम, मोईन खान आणि शोएब मलिक पाकिस्तानी वाहिनीवर चर्चेसाठी आले होते. त्यावेळी एका प्रेक्षकांने या भारतीय संघाला कसं रोखलं जाऊ शकतं? असा प्रश्न विचारला. अँकरने हा प्रश्न वसीम अक्रमकडे वळवला. तेव्हा, तुम्ही त्याची बॅट चोरा किंवा शूज चोरा. तेव्हाच ते सामना गमावतील, असं उत्तर वसीम अक्रमने दिलंय. वसीम अक्रमच्या या उत्तरावर सर्वजण हसू लागले. 




दरम्यान, "आम्ही त्याला मॉडर्न क्रिकेटमधील महान फलंदाज का म्हणतो हे सिद्ध केल्याबद्दल विराट कोहलीचं अभिनंदन. तो या खेळातील सर्वोच्च स्थानी आहे. या धावपट्टीवर फलंदाजी करणं सोपं नव्हतं. रोहित शर्मा ज्याप्रकारे फलंदाजी करत आहे त्यामुळे इतरांवरील दबाव कमी होतो. रोहित शर्मा अविश्वसनीय आहे. दुसरी विकेट पडली तोवर सामना भारताच्या बाजूने झुकला होता आणि दक्षिण आफ्रिका पाहत राहिली," असं वसीम अक्रमने सांगितलं.