World Cup 2023 : साऊथ अफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाची धमाल! ड्रेसिंग रूममधील Video व्हायरल

Indian Dressing room Video : वर्ल्ड कपच्या 37 व्या सामन्यात टीम इंडियाने साऊथ अफ्रिकेविरुद्ध 243 धावांनी विजय (IND vs SA Clash) मिळवला. या एकहाती विजयानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात खेळाडू मस्ती करताना दिसतायेत.

सौरभ तळेकर | Updated: Nov 6, 2023, 07:47 PM IST
World Cup 2023 : साऊथ अफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाची धमाल! ड्रेसिंग रूममधील Video व्हायरल title=
Indian Dressing room Video

Team india's Celebration After IND vs SA Clash : भारतीय खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे टीम इंडियाने वर्ल्ड कपमधील (World Cup 2023) 8 वा विजय नोंदवला आहे. तगड्या साऊथ अफ्रिकेचा पराभव करून टीम इंडियाने पाईंट्स टेबलच्या (WC Points table) अव्वल स्थानी विजयी पताका रोवला. वर्ल्ड कप फायनलच्या दृष्टीने साऊथ अफ्रिका इंडियासाठी सर्वात घातक टीम होती. मात्र, भारतीय गोलंदाजांनी त्यांना देखील गुडघ्यावर टेकवलं. त्यामुळे आता रोहित शर्माचं (Rohit Sharms) देखील टेन्शन गेलंय. अशातच आता एकहाती विजयानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ (Dressing room Video) समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये संघातील स्टार धमाल करताना दिसत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, टीम इंडियाचे फिल्डिंग कोच टी. दिलीप यांनी भारतीय खेळाडूंनी मैदानावर उत्कृष्ट प्रदर्शन केल्याबद्दल आणि प्रत्येक धाव वाचवण्यासाठी खेळाडूंच्या फिल्डिंगचं कौतूक केलं. यामध्ये त्यांनी  सूर्यकुमार यादव, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि रोहित शर्मा यांचा विशेष उल्लेख केला. त्यावेळी त्यांनी आठव्या सामन्यानंतर फिल्डिंग मेडल (Best Fielder Medal) कोणाला जाणार? याची घोषणा केली.

कर्णधार रोहित शर्माची 'सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक'चं मेडल आपल्या गळ्यात घातलं आहे. अनोख्या पद्धतीने विजेत्याची घोषणा करण्यात आली. त्याचा व्हिडीओ बीसीसीआयने (BCCI) शेअर केला आहे. यामध्ये शुभमन गिल आणि इशान किशन, कॅप्टन रोहित शर्मासोबत मस्ती करताना दिसत आहेत.

पाहा Video

विजयानंतर रोहित शर्मा म्हणतो...

आमच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. पहिल्याच षटकात आम्ही एक विकेट गमावली. त्यानंतर धावा मिळाल्या आणि त्यानंतर फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. कोहलीने परिस्थितीशी समावून घेऊन खेळण्याची गरज होती, ते त्याने केलं. शमीने ज्या पद्धतीने पुनरागमन केले आहे, ती मानसिकता दर्शवते. अय्यर किती सक्षम आहे हे गेल्या दोन सामन्यांनी दाखवून दिलंय. गिल आणि मी बर्‍याच काळापासून एकत्र फलंदाजी करत आहोत. आम्ही काहीही पूर्वनियोजन करत नाही. आम्ही फक्त मूल्यांकन करतो आणि त्यानुसार खेळतो. जडेजाने सामन्यात खूप उत्तम खेळ दाखवून दिलाय, असं म्हणत रोहितने खेळाडूंचं कौतूक केलं होतं.