Harbhajan Singh About Dhoni : भारतीय क्रिकेटमध्ये एकेकाळी मॅच विनर जोडी म्हणून हरभजन सिंह आणि एम एस धोनी यांच्याकडे पाहिलं जायचं. धोनी आणि हरभजन या दोघांनी भारताला 2007 आणि 2011 चा वर्ल्ड कप जिंकवून देण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली होती. मात्र सध्या माजी गोलंदाज हरभजन सिंहचं (Harbhajan Singh) धोनीबाबत केलेलं एक वक्तव्य चर्चेत आहे. यात भज्जीने तो धोनीशी (MS Dhoni) जवळपास 10 वर्ष झाली बोलला नाही असे सांगितले. त्यामुळे या दोघांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. 


2011वर्ल्ड कपनंतर हरभजन संघातून बाहेर पडू लागले : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरभजन सिंह 2011 पर्यंत भारताच्या टेस्ट, वनडे आणि टी 20 संघामधील एक महत्वाचा भाग होते. पण 2011 वर्ल्ड कप फायनल आणि 2015 च्या वर्ल्ड कप दरम्यान सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि झहीर खान अशा अनेक खेळाडूंनी निवृत्ती घेतली. हरभजन सिंह, युवराज सिंह या दिग्गजांना संघातून हळूहळू वगळण्यात आले. दोन्ही खेळाडूंनी आपल्याला संघात चांगली वागणूक मिळत नसल्याचे म्हटले होते. हरभजन सिंह आणि धोनी भारताकडून शेवटचे एकत्र 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळले होते. तीन वर्षांनी हरभजनला सीएसकेने खरेदी केल्याने दोघे तब्बल तीन वर्ष आयपीएलमध्ये सोबत होते. मात्र आता हरभजन सिंहने म्हटले आहे की गेली 10 वर्ष तो धोनीशी बोललेला नाही. 


हरभजन सिंह काय म्हणाला?


भारताचा दिग्गज गोलंदाज हरभजन सिंहने एका माध्यमाशी बोलताना म्हटले की, 'मी धोनीशी बोलत नाही. जेव्हा आयपीएलमध्ये CSK कडून खेळत होतो तेव्हा बोलणं व्हायचं, पण त्याशिवाय आम्ही जास्त बोललो नाहीये. आता याला १० वर्षांपेक्षा अधिक काळ झालाय. माझ्याकडे त्याच्याशी बोलण्याकरता काही कारण नाहीये. जेव्हा मी सीएसकेकडून खेळत होतो तेव्हा आमचं बोलणं व्हायचं, पण ते मैदानापुरतंच सीमित होतं. ना कधी मी त्याच्या खोलीत गेलो ना कधी तो माझ्या खोलीत आला'.  हरभजनने युवराज आणि आशिष नेहरा यांचं नाव घेतल यांच्याशी तो नेहमी बोलतो असं त्याने मुलाखतीत सांगितलं. यामुळे हरभजन आणि धोनीमध्ये दुरावा निर्माण झालाय का? असा सवाल चाहत्यांच्या मनात आलाय. 


हेही वाचा : फक्त विनोद कांबळीच नाही तर व्यसनामुळे 'या' 4 क्रिकेटर्सचंही करिअर उध्वस्त झालंय


 


मी केवळ त्यांनाच फोन करतो जे माझा फोन उचलतात : 


मुलाखतीत हरभजन सिंहने पुढे म्हटले की, ' माझ्या मनात त्याच्याबद्दल (धोनी) कोणतीही वाईट भावना नाही. जर त्याला माझ्याशी काही बोलायचं असेल तर तो मला सांगू शकतो. पण त्याला माझ्याशी काही बोलायचं असतं तर आत्तापर्यंत सांगितलं असत.  मी त्याला कधीही कॉल करण्याचा प्रयत्न केला नाही मी फक्त त्यांनाच कॉल करतो जे माझा फोन उचलतात.  माझ्याकडे इतर कशासाठीही वेळ नाही. मी माझ्या मित्रांच्या संपर्कात राहतो. नातं हे नेहमी घेणं आणि देण्याचं असतं. जर मी तुमचा आदर केला तर मला आशा आहे की तुम्हीही माझा आदर कराल'.