World Cup Trophy in Pune : पुणेकरांनो संधी सोडू नका...! `या` वेळेत निघणार वर्ल्ड कप ट्रॉफीची भव्य मिरवणूक
ICC ODI World Cup : पुणे शहरात (World Cup Trophy in Pune) वर्ल्ड कप ट्रॉफीची येणार आहे. त्याचबरोबर जे डब्ल्यु मॅरिट ते ॲग्रीकल्चर कॉलेज अशी भव्य मिरवणूक देखील निघेल.
World Cup Trophy : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आयसीसी क्रिकेट विश्वचषकाची ट्रॉफी आता 18 देशात फिरून भारतात आली आहे. कुवेत, बहरीन, मलेशिया, अमेरिका, नायजेरिया, युगांडा, फ्रान्स, इटली अशा एकूण 18 देशात वर्ल्ड कपच्या ट्रॉफी नेण्यात आली होती. 27 जुलै रोजी सुरू झालेला वर्ल्ड कप ट्रॉफीचा दौरा 4 सप्टेंबर रोजी संपला आहे. त्यानंतर आता पुणे शहरात (World Cup Trophy in Pune) वर्ल्ड कप ट्रॉफीची येणार आहे. त्याचबरोबर जे डब्ल्यु मॅरिट ते ॲग्रीकल्चर कॉलेज अशी भव्य मिरवणूक देखील निघणार आहे. त्यामुळे आता पुणेकरांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळतंय.
वर्ल्ड कप ट्रॉफीच्या (World Cup Trophy) भव्य मिरवणुकीसाठी सजवलेल्या गाडीतून ट्रॉफीची उद्या म्हणजेच मंगळवारी प्रथमच पुण्यात भव्य मिरवणूक निघणार आहे. वर्ल्ड कपची ट्रॉफी डोळ्यांनी पाहण्यासाठी एकच संधी आहे. पुन्हा 25 वर्षांनीच ही ट्रॉफी भारतात येईल. त्यामुळे ट्रॉफी पाहण्याची दुर्मिळ संधी गमावू नका. या ट्रॉफीची भव्य मिरवणूक देखील निघणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून ही मिरवणूक निघणार आहे.
कसा असेल मिरवणुकीचा मार्ग?
पुण्यातील जे डब्ल्यु मॅरिट हॉटेलपासून या मिरवणुकीची सुरूवात होईल. सेनापती बापट रोड ते सिंबायोसिस कॉलेज या मार्गने मिरवणूक निघणार आहे. बीएमसीसी कॉलेज, एमएमसीसी कॉलेज ते फर्ग्युसन कॉलेज रोडवरून मिरवणूक निघणार आहे. त्याचबरोबर ॲग्रीकल्चर कॉलेजमध्ये या मिरवणुकीची सांगता होणार आहे. ॲग्रीकल्चर कॉलेजमध्ये सायंकाळी 4 ते 6 या वेळेत ही ट्रॉफी क्रिकेट रसिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येईल.
आणखी वाचा - धक्कादायक! वर्ल्ड कप चॅम्पियन कपिल देव किडनॅप? खळबळजनक व्हिडीओ समोर
रोहित पवारांचं आवाहन
दरम्यान, 25 वर्षांनंतर ही ट्रॉफी भारतात येणार असल्याने ट्रॉफी पाहण्याची दुर्मिळ संधी गमावू नका आणि या मिरवणुकीत सहभागी व्हायलाही विसरू नका, असं आवाहन रोहित पवार यांनी केलंय. सोशल मीडियावर त्यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केलाय.
ट्रॉफी बनवण्यासाठी खर्च किती?
आयसीसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॉफीची किंमत 40 हजार पौंडपेक्षा जास्त आहे (आजच्या दरात ही रक्कम 30,85,320 रुपये आहे). ट्रॉफीचं वजन सुमारे 11 किलो आहे. ट्रॉफीची रचना प्लॅटोनिक परिमाणांमध्ये केली गेली आहे जेणेकरून ती कोणत्याही कोनातून पाहिली जात असली तरीही तिची विशिष्टता दिसून येईल.