डर्बी : अनुभवी मिताली राजच्या नेतृत्त्वात आज भारतीय महिला टीमची यजमान इंग्लंडच्या टीमसोबत लढत होतीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच झालेल्या चौरंगी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला 8 विकेट्स राखून नमवल्यानं टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावलाय. 


२००५ मध्ये उपविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघानं आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धचे तीन सामने टाळल्यामुळे विश्वचषक स्पर्धेतील थेट प्रवेशाची संधी गमावली. त्यानंतर पात्रतेचा अडसर पार करत भारतानं इथवर मजल मारलीय.


या सामन्यात महिला टीम इंडियाला मिताली राजचं अनुभवी नेतृत्व मिळतंय. मितालीनं नुकतेच १०० व्या सामन्यात देशाचं नेतृत्त्व केलं हा पराक्रम करणारी ती महिला क्रिकेट विश्वातील तिसरी खेळाडू ठरलीय. मागील सहा सामन्यांमध्ये सलग अर्धशतकं झळकावणारी मिताली इंग्लंडमध्येही आपल्या कामगिरीतील सातत्य टिकवण्यात उत्सुक आहे.