ICC World Cup 2023 India vs Australia : क्रिकेट हा खेळ जगातील काही मोजक्या देशातच खेळला जात असला, तरी  या खेळाच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. भारतात तर हा खेळ इतका लोकप्रिय आहे की क्रिकेट (Cricket) म्हणजे धर्म मानला जातो. तर खेळाडूना देवाचा दर्जा दिला जातो. त्यातच आता क्रिकेटचा विश्वचषक खेळवला जातो आणि तो ही भारतात. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणीच आहे. यंदा पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेत एकटा यजमान देश आहे. याधीच्या सर्व विश्वचषक स्पर्धा दोन देशांनी मिळून आयोजित केल्यात. भारतातल्या दहा स्टेडिअमवर विश्वचषक स्पर्धेचे सामने खेळवले जात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्यांदाच असं घडलं
भारतात क्रिकेटची कोणतीही स्पर्धा असली की त्याला प्रेक्षकांचा भरभरुन पाठिंबा असतो. त्यातही भारतीय क्रिकेट संघाचे सामने म्हटलं की स्टेडिअममध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. पण यंदा भारतात खेळवल्या जात असलेल्या विश्वचषक स्पर्धेत (World Cup 2023) वेगळचं चित्र पाहिला मिळतंय. भारत आणि ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) पहिला चेन्नईच्या चिदम्बरम स्टेडिअममध्ये (Chennai Chidambaram Stadium) रंगला. पण तुमचा विश्वास बसणार नाही. या सामन्यात स्टेडिअममधला अनेक खुर्च्या चक्क रिकाम्या होत्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना सुरु झाल्यानंतर एमए चिदम्बरम स्टेडिअममधल्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून लोकांनी बीसीसीआयला ट्रोल केलं आहे. 


सामन्याला लोकांची गर्दी का नाही?
विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेला आणि त्यातही भारताच्या सामन्याला क्रिकेट चाहत्यांची गर्दी नसल्याने प्रश्न उपस्थइत केला जात आहे. याची दोन कारणं सांगितली जात आहे. सध्या ऑक्टोबर हिट सुरु आहे आणि चेन्नईत उन्हाचे तीव्र चटके बसतायत. त्यामुळे लोकं बाहेर पडत नाहीएत. दुसरं मोठं कारण म्हणजे विश्चचषक स्पर्धेसाठीच्या तिकिटविक्रीच ढिसाळ व्यवस्था.


क्रिकेट चाहत्यांचा आरोप
तिकिट विक्रीत मोठ्या प्रमाणावर काळाबाजार झाल्याचा आरोप क्रिकेट चाहत्यांकडून केला जात आहे. त्यातच बीसीसीआयचने दिलेल्या अधिकृत वेबसाईवर अनेक प्रयत्नांनंतरही तिकिट बूक होत असल्याचंही क्रिकेट चाहत्यांचं म्हणणं आहे. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याची तिकिटांची चिदम्बरम स्टेडिअमबाहेर चढ्यादराने विक्री होत असल्याचंही समोर आहे.



पहिल्या सामन्यातही हंगामा
5 ऑक्टोबरला विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली. गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंडदरम्यान सलामीचा सामना खेळवण्यात आला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवण्या आला, पण या सामन्यातही अर्ध्याहून अधिक स्टेडिअम रिकामं होतं. बांगलादेश-अफगाणिस्तान, श्रीलंका-दक्षिण आफ्रिका सामन्यातही काहीसं असंच चित्र पाहिला मिळालं.