ICC World Cup 2023 Aust vs NZ : आयसीसी विश्वचषकातल्या 27 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पाच धावांनी पराभव (Australia beat New Zealand) केला. हिमाचल प्रदेशच्या धरमशाला क्रिकेट स्टेडिअमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिली फलंदाजी करताना 49.2 षटकात 388 धावांचा डोंगर उभा केला. याला न्यूझीलंडने तोडीसतोड उत्तर दिलं. न्यूझीलंडने 50 षटकात 383 धावा केल्या, पण अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा पाच धावांनी पराभव झाला.  रचिन रविंद्रने (Rachin Ravindra) शतकी खेळी करत न्यूझीलंडच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण त्याची खेळी व्यर्थ गेली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया सेमीफायनलच्या दिशेने
पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्कराव्या लागल्या ऑस्ट्रेलियाने स्पर्धेत जबरदस्त कमबॅक केला आहे. ऑस्ट्रेलियाने सलग चार सामने जिंकत सेमीफायनलच्या (WC Semifinal) दिशेने मजबूत पाऊल टाकलं आहे. चार विजयासह ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 8 पॉईंट जमा झाले असून चौथ्या क्रमांकावर आहेत. न्यूझीलंडलाही सहा सामन्यात 2 पराभव स्विकारावे लागले आहेत. न्यूझीलंडच्या खात्यातही आठ पॉईंट जमा असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 


ऑस्ट्रेलियाची तुफान फटकेबाजी
ऑस्ट्रेलियाने तुफान फटेकाबाजी करत 388 धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर ट्रेविस हेड आणि डेव्हिड वॉर्नरने पहिल्या विकेटसाठी तब्बल 175 धावांची पार्टनशिप केली. अवघ्या एकोणीस ओव्हरमध्ये या जोडीने पावणेदोनशे धावा कुटल्या. ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन करणारा ट्रेविस हेडने अवघ्या 67 चेंडूत 109 धावा केल्या. यात त्याने 10 चौकार आणि 6 षटकार लगावले. तर जबरदस्त फॉर्मात असलेल्या वॉर्नरने 65 धावात 81 धावा केल्या. यानंतर ग्लेन मॅक्सवेलने 41 धावा करत स्कोर वाढवला. न्यूझीलंडतर्फे ग्लेन फिलिप्स आणि ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.


रचिन रविंद्रची शतकी खेळी
ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य धावसंख्येला न्यूझीलंडनेही जबरदस्त उत्तर दिलं. रचिन रविंद्रने 116 धावांची खेळी केली. यात त्याने पाच षटकार आणि नऊ चौकार लगावले. यानंतर जेम्स निशमने तुफान फटकेबाजी करत न्यूझीलंड संघाला आव्हानाच्या अगदी जवळ आणून ठेवलं. पण या दोघांचा लढा व्यर्थ ठरला. न्यूझीलंडचा हा सलग दुसरा पराभव ठरला. याआधीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला होता. 


ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी तीन सामने अद्याप खेळायचे बाकी आहेत. सेमीफायनलमधलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी या दोन्ही संघाना किमा दोन विजय मिळवावे लागणार आहेत.