Video : मियां मॅजिक! सिराजने बेल्ससोबत असं काही केलं की पुढच्या ओव्हरला लाबुशेनची विकेटच पडली
IND VS AUS 3rd Test : गोलंदाज मोहम्मद सिराजने असं काही केलं की ज्यामुळे पुढच्या ओव्हरला ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज लाबुशेनची विकेट पडली. सध्या सिराजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
IND VS AUS 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात सध्या 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. शनिवार 14 डिसेंबर पासून गाबा येथे सुरु झालेल्या तिसऱ्या सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे खराब झाला. परिणामी केवळ 13 ओव्हर्सचा खेळ होऊ शकला, पण या दरम्यान भारताला एकही विकेट मिळवता आली नव्हती. रविवारी दुसऱ्या दिवशी सामन्याच्या सुरुवातीला बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या दोन विकेट्स घेऊन चांगली सुरुवात केली, मात्र तिसऱ्या विकेटसाठी टीम इंडियाला 10 ओव्हर्स वाट पाहावी लागली. दरम्यान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) असं काही केलं की ज्यामुळे पुढच्या ओव्हरला ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज लाबुशेनची विकेट पडली. सध्या सिराजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
नेमकं काय घडलं?
गाबा टेस्टच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची एक ऍक्शन खूप चर्चेत राहिली. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असताना 33 ओव्हरला सिराज गोलंदाजी करत होता. तर त्याच्या समोर स्ट्राईकवर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन होता. सिराजने ओव्हरचा पहिलाच बॉल टाकल्यावर तो सरळ फलंदाजाच्या जवळ आला आणि त्याने स्टंप्सवरील बेल्सची अदलाबदल केली. सिराज बेल्स सोबत नेमका काय करतोय हे लाबुशेन आश्चर्याने पाहत होता. सिराज बेल्सची अदलाबदल करून निघाला आणि त्याची पाठ होताच लाबुशेन पुन्हा बेल्स बदलल्या. ही कृती पाहून मैदानातील खेळाडूंना तसेच प्रेक्षकांना देखील हसू आवरले नाही.
मोहम्मद सिराजला त्या ओव्हरला एकही विकेट मिळाली नाही. परंतु 34 वी ओव्हर टाकायला आलेल्या नितीश रेड्डीने दुसऱ्या बॉलवर लाबुशेनची विकेट मिळवली. नितेशने टाकलेल्या बॉलवर लाबुशेनने शॉट खेळला परंतु विराटने त्याची कॅच पकडली आणि तो बाद झाला. लाबुशेनने 55 बॉलमध्ये 12 धावा केल्या होत्या.
पाहा व्हिडीओ :
भारताची प्लेईंग 11 :
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
ऑस्ट्रेलियाची प्लेईंग 11 :
उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.
हेही वाचा : यंदा विराट कोहली नाही तर 'हा' युवा क्रिकेटर बनू शकतो RCB चा नवा कर्णधार
कुठे पाहता येणार सामना?
एडिलेड येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार दुसरा टेस्ट सामना हा प्रेक्षकांना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्स या चॅनलवर पाहता येईल. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिझनी हॉटस्टारवर करण्यात येईल.