यंदा विराट कोहली नाही तर 'हा' युवा क्रिकेटर बनू शकतो RCB चा नवा कर्णधार

IPL 2025 RCB Captain : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ऑक्शनपूर्वी विराट कोहलीला 21 कोटींना रिटेन केलं. तसेच आयपीएल 2025 मध्ये विराट कोहली आरसीबीचं नेतृत्व करेल अशी चर्चा होती. 

पुजा पवार | Updated: Dec 15, 2024, 09:29 AM IST
यंदा विराट कोहली नाही तर 'हा' युवा क्रिकेटर बनू शकतो RCB चा नवा कर्णधार  title=
(Photo Credit : Social Media)

IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League)  जगप्रसिद्ध टी 20 लीगच्या 18 व्या सीजनसाठी नोव्हेंबर महिन्यात मेगा ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमधून एकूण 182 खेळाडूंना फ्रेंचायझींनी आपल्या संघात खरेदी केलं. आता आयपीएल 2025 (IPL 2025) साठी क्रिकेट प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकतता आहे. यंदा आरसीबीने ऑक्शनपूर्वी विराट कोहली (Virat Kohli) सह रजत पाटीदार (Rajat Patidar) आणि गोलंदाज यश दयाल या फक्त 3 खेळाडूंना रिटेन केलं. तर मागील दोन वर्ष आरसीबीचा कर्णधार राहिलेल्या फाफ डू प्लेसिसला त्यांनी रिटेन केलं नाही तसेच ऑक्शनमध्येही खरेदी केलं नाही. त्यामुळे आयपीएल 2025 मध्ये आरसीबीचा नवा कर्णधार कोण असणार याची उत्सुकतता चाहत्यांना आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ऑक्शनपूर्वी विराट कोहलीला 21 कोटींना रिटेन केलं. तसेच आयपीएल 2025 मध्ये विराट कोहली आरसीबीचं नेतृत्व करेल अशी चर्चा होती. मात्र आता पुढील कर्णधार म्हणून आरसीबीच्या युवा खेळाडूचं नाव समोर येत आहे. 31 ट्रॉफीमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी प्रभावशाली कामगिरी केली होती.

सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी : 

मध्य प्रदेशचा कर्णधार असलेल्या रजत पाटीदारने पाच रणजी सामन्यांमध्ये 53.37 च्या सरासरीने एक शतक आणि एक अर्धशतकांसह 427 धावा केल्या आहेत. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या चालू सीजनमध्ये अजिंक्य रहाणे (432) आणि बिहारच्या साकिबुल गनी (353) नंतर सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा फलंदाज आहे. त्याने नऊ सामन्यांमध्ये चार अर्धशतकांसह 182.63 च्या स्ट्राइक रेटने 347 धावा केल्या आहेत. आता रविवारी मुंबईविरुद्ध होणा-या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी फायनलमध्ये पहिल्यांदाच विजेतेपद पटकावण्याचे आव्हान पाटीदारसमोर असणार आहे. 

हेही वाचा : मिस टू मिसेस! बॅडमिंटनपटू PV Sindhu च्या साखरपुड्याचा पहिला फोटो समोर

 

RCB चं नेतृत्व करायला आवडेल : 

रजत पाटीदारने एका मुलाखतीत बोलताना म्हटले की, 'आरसीबीने आयपीएल 2025 साठी रिटेन केल्याने आत्मविश्वास वाढला. आरसीबी ही मोठी फ्रँचायझी आहे आणि मला आरसीबीकडून खेळायला आवडते. संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यास मला आनंद होईल. पण या संदर्भात कोणताही निर्णय फ्रँचायझीवर अवलंबून असतो'. आयपीएल 2024 मध्ये आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यासाठी रजत पाटीदारचा मोठा सहभाग होता. पाटीदारने गेल्या आयपीएलच्या 13 सामन्यांमध्ये 395 धावांची कामगिरी केली होती. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 177 इतका होता'.