Video : पापा कहते है बड़ा नाम करेगा! 22 वर्षाच्या लेकाला भारतासाठी शतक ठोकताना पाहून वडिलांना अश्रू अनावर
Nitish Kumar Reddy Father Emotional : दिग्गज फलंदाज टीम इंडियासाठी मोठी खेळी करण्यात अपशयी ठरले असताना, डेब्यू टेस्ट सीरिज खेळणाऱ्या 22 वर्षीय खेळाडू नितीश कुमार रेड्डीने भारतासाठी दमदार शतक झळकावलं. यावेळी स्टॅन्डमध्ये बसलेल्या त्याच्या वडिलांना अश्रू अनावर झाले.
IND VS AUS 4th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामान्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) टेस्ट सीरिज सुरु असून यातील चौथा सामना मेलबर्न येथे खेळवला जात आहे. मेलबर्न येथील सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाने 474 धावांची खेळी केली होती. तर ऑस्ट्रेलियाची ही आघाडी मोडीत काढताना टीम इंडियाची मात्र दमछाक झाली. दिग्गज फलंदाज टीम इंडियासाठी मोठी खेळी करण्यात अपशयी ठरले असताना, डेब्यू टेस्ट सीरिज खेळणाऱ्या 22 वर्षीय खेळाडू नितीश कुमार रेड्डीने भारतासाठी दमदार शतक झळकावलं. यावेळी स्टॅन्डमध्ये बसलेल्या त्याच्या वडिलांना अश्रू अनावर झाले.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधून भारताकडून टेस्ट सीरिजमध्ये पदार्पण करणाऱ्या 22 वर्षांच्या नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) मेलबर्न टेस्टमध्ये 8 व्या नंबरवर फलंदाजीसाठी आला. यावेळी त्याने वॉशिंग्टन सुंदरसोबत चांगली पार्टनरशिप कडून दमदार शतक झळकावले. नितीशने 172 बॉलमध्ये 104 धावा केल्या असून दरम्यान त्याने 10 चौकार आणि 1 षटकार ठोकले. टीम इंडियाचे अनुभवी फलंदाज एकामागोमाग एक पॅव्हेलियनमध्ये जात असताना नितीश कुमार रेड्डीने मैदानात जम बसवला आणि 83 बॉलमध्ये 51 धावा करत अर्धशतक ठोकले.
वडिलांना अश्रू अनावर :
नितीश कुमार रेड्डीने बॉर्डर गावसकर ट्रॉफी टेस्ट सीरिजच्या पर्थ येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नितीश कुमार रेड्डीला मेलबर्न येथील चौथ्या टेस्ट सामन्यात प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली यावेळी त्याने 83 बॉलमध्ये 51 धावा करत अर्धशतक ठोकले. अर्धशतक ठोकताच नितीशने पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुनची 'झुकेगा नही साला' ही ऍक्शन करत सेलिब्रेशन केले. बघता बघता नितीश ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना घाम फोडून धावा करत राहिला आणि त्याने 172 बॉलमध्ये 104 धावा करून शतक ठोकले. शतक पूर्ण केल्यावर नितीश जमिनीवर बसला त्याने बॅट जमिनीवर उभी करून त्याच्यावर हेल्मेट ठेऊन सेलिब्रेशन केले. यावेळी स्टॅन्डमध्ये बसलेल्या नितीशच्या वडिलांना लेकाने केलेला पराक्रम पाहून आनंदाश्रू अनावर झाले. त्यांनी नितीशसाठी जोर जोरात टाळ्या वाजवल्या आणि त्याचे अभिनंदन केले. नितीशचे वडील मुत्याला रेड्डी हे हिंदुस्थान झिंकचे माजी कर्मचारी होते. मुलाच्या क्रिकेट करिअरसाठी त्यांनी आपल्या सेवेची 25 वर्ष शिल्लक असताना नोकरीतून डीआरएस घेतली.
पाहा व्हिडीओ :
काय म्हणाले नितीशचे वडील?
नितीश कुमार रेड्डीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच पहिलं शतक ठोकल्यावर वडील भावूक झाले. नितीश म्हणाला, "नितीश जेव्हा 99 वर खेळत होता तेव्हा मी खूप चिंतेत होतो आणि माझ्या मुलाचं शतक पूर्ण व्हावं यासाठी प्रार्थना करत होतो. विराट कोहली हा नितीशचा आदर्श आहे. विराटने त्याला सांगितले की कठोर परिश्रमाला पर्याय नाही. आम्ही संपूर्ण कुटुंब नितीशच्या या शतकाने भारावून गेलोय. आमच्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे".
कोण आहे नितीश कुमार रेड्डी?
नितीश कुमार रेड्डी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत होता, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला प्रथमच ओळख मिळाली जेव्हा आयपीएल 2023 पूर्वी सनरायझर्स हैदराबादने त्याला 20 लाख रुपयांना विकत घेतले होते. पहिल्या सत्रात त्याला फारसे सामने खेळायला मिळाले नाहीत, पण 2024 च्या सीजनमध्ये त्याने सनरायझर्स हैदराबादसाठी दोन अर्धशतकांसह 303 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 143 च्या जवळपास होता आणि त्याने आयपीएल 2024 मध्ये गोलंदाजी करताना 3 बळीही घेतले होते. 2024 मध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या पर्थ टेस्टमध्ये ऑल राउंडर खेळाडू असलेल्या नितीश कुमार रेड्डीला पदार्पणाची संधी मिळाली. त्याने या संधीचं सोनं केलं.