Border Gavaskar Trophy Ind Vs Aus : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही क्रिकेट संघांदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या Border Gavaskar Trophy मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. बीसीसीआयकडून या मालिकेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याचा निर्णय BCCI कडून घेण्यात आला आहे. निर्धारित रुपरेषेनुसार या मालिकेचा तिसरा सामना हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे खेळला जाणार होता. पण, आता मात्र हे ठिकाण बदललं असून सामना इंदूरमध्ये खेळवला जाईल. सोमवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्रकातून माहिती देत बीसीसीआयनं लिहिलं, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये जिथं भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियातील तिसरा कसोटी साना 1 ते 5 मार्चदरम्यान, एचपीसीए स्टेडियम धरमशाला येथे खेळवला जाणार होता, तो आता इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवला जाईल. सदर भागात कडाक्याची थंडी आणि हवामानात बदल होत असल्यामुळं आऊटफिल्डमध्ये अपेक्षित तयारी पाहायला मिळत नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. 


हेसुद्धा वाचा : Virat Kohli : दुसऱ्या कसोटीत 'या' विक्रमासह कोहली इतिहास रचणार, जगातील कोणताही सक्रीय खेळाडू हे करु शकलेला नाही !


 


थोडक्यात हिमाचलच्या पट्ट्यामध्ये हवामानामुळं मैदानावर काम करणाऱ्यांनाही संपूर्ण मैदानात अपेक्षित उंचीचं गवत उगवणं अशक्य आहे. ज्यामुळं आऊटफिल्ड प्रभाविक असेल. दरम्यान, या मालिकेतील दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. 


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचं वेळापत्रक खालीलप्रमाणे 


दुसरा कसोटी सामना - 17 ते 21 फेब्रुवारी - नवी दिल्ली 
तिसरा कसोटी सामना- 1 ते 5 मार्च - इंदूर 
चौथा कसोटी सामना- 9 ते 13 मार्च- अहमदाबाद 


भारत या मालिकेत आघाडीवर 


चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेमध्ये पहिला सामना नागपूर येथे खेळला गेला होता. यामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली असणाऱ्या संघानं 132 धावांनी सामना जिंकत मालिकेत 1- 0 अशी आघाडी मिळवली. या सामन्यामध्ये पाहुण्या ऑस्ट्रेलियाच्या संघानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, रवींद्र जडेजाडच्या आक्रमक गोलंदाजीच्या बळावर कांगारूंचा संघ 177 धावांमध्येच गुंडाळला गेला.