David Warner bats right handed against R Ashwin: भारतामध्ये लोकप्रिय असलेल्या परदेशी क्रिकेटपटूंची नावं घेतल्यास ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हीड वॉर्नरचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. ऑस्ट्रेलियाच्या या डावखुऱ्या फलंदाजाने भारताने इंदूर येथील एकदिवसीय सामन्यात दिलेल्या 400 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी चक्क उजव्या हातानेही फलंदाजी केली. एवढ्या मोठी धावसंख्या गाठण्याच्या प्रयत्नात मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात करणं अपेक्षित होतं. मात्र सुरुवातीलाच त्याना मॅथ्यू शॉर्ट आणि स्टीव्ह स्मिथ दोघेही बाद झाले आणि ऑस्ट्रेलिया सुरुवातीपासूनच कच खावून खेळू लागली.


अश्विनविरुद्ध उजव्या हताने खेळायला गेला अन्...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र दुसऱ्या बाजूला सलामीवर डेव्हीड वॉर्नर खेळाचा आनंद घेत तुफान फटकेबाजी करत होता. एका क्षणी अचानक हा डावखुरा फलंदाज उजव्या हाताने फलंदाजी करु लागला. बरं वॉर्नरनं असं पहिल्यांदाच केलं आहे असंही नाही. यापूर्वीही त्याने काही सामन्यांमध्ये असा प्रयोग केला असून त्यात त्याला यशही आलं. भारताविरुद्ध खेळतानाही वॉर्नरनं अगदी अर्धशतकही झळकावलं. मात्र त्यानंतर उजव्या हाताने फलंदाजी करताना अश्विनचा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका मारत सीमेपार धाडण्याच्या प्रयत्नात वॉर्नर बाद झाला. वॉर्नर एलबीडब्ल्यू झाला. वॉर्नरने रिव्ह्यू घेतला नाही. मात्र रिप्लेमध्ये चेंडू बॅटची कड घेऊन पॅडला आदळल्याचं दिसलं. तरीही वॉर्नरने रिव्ह्यू न घेतल्याने त्याला 39 चेंडूत 53 धावा करुन तंबूत परतावं लागलं. 


तुम्हीच पाहा व्हिडीओ


वॉर्नरने अचानक उजव्या हाताने फलंदाजी सुरु केल्याने डगआऊटमध्ये बसलेल्या त्याच्या सहकाऱ्यांनाही हसू अनावर झालं. 15 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर संघाची धावसंख्या 100 वर असताना डेव्हिड वॉर्नरच्या रुपात ऑस्ट्रेलियाचा चौथा गडी तंबूत परतला. त्यानंतर अश्विनने पुढच्याच ओव्हरमध्ये जॉश इंग्लीशला यष्ट्यांसमोर पकडलं अन् हा फलंदाजही 9 चेंडूंमध्ये 6 धावा करुन एलबीडब्ल्यू झाला. यापूर्वीच अश्विनने मार्नस लाबुशेनला बोल्ड केलं होतं. अश्विनने वॉर्नरला कसं बाद केलं पाहा व्हिडीओ...



अश्विनने मोडला कुंबळेचा विक्रम


अश्विनने त्याच्या 7 ओव्हरमध्ये 41 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. या 3 विकेट्सच्या जोरावर अश्विनने भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेचा विक्रम मोडला. आता अश्विन हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अश्विनला वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघांमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. मात्र त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये संधी देण्यात आलेली.