IND vs AUS T20 WC Update: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS T20 WC ) यांच्यात आज (23 फेब्रुवारी 2023) केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर महिला टी-20 विश्वचषकात 2023 स्पर्धेतील पहिला सेमीफायनल सामना खेळला जाणार आहे. मात्र भारतासाठी क्रिकेटच्या या फॉर्मेटमध्ये ऑस्ट्रेलियाच पारडं वरचढ आहे. मागच्या दोन मोठ्या टुर्नामेंटमध्ये भारताचा ऑस्ट्रेलिया (IND vs AUS T20 ) विरुद्धच फायनलमध्ये पराभव झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत 30 T20 सामने झाले आहेत. यात 30 पैकी 22 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. यामुळे कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात आज भारतीय संघ कशी कामगिरी बजावतोय? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय संघाच्या क्रमवारीतही भारतीय संघ (Team India) ऑस्ट्रेलियापेक्षा खूप मागे आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे. त्यातच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 30 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी 22 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजय नोंदवला आहे. तर, फक्त 6 सामन्यात भारताला विजय मिळवता आला आहे. याशिवाय, एक सामना रद्द आणि एक सामना अनिर्णित ठरला आहे.  


वाचा: 7 महिन्यांनंतर Rohit Sharma वनडे टीममध्ये 'या' घातक खेळाडूची करणार एन्ट्री


सामना कुठे पाहाल? 


भारत आणि ऑस्ट्रेलिया सेमी फायनलचा सामना हा स्टार स्पोर्ट्स (Star Sports) वाहिन्यांवर पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर  डिस्ने-हॉटस्टारवरही (Disney-Hotstar) पाहू शकता. 


सामना किती वाजता सुरू होईल? 


सामन्याच्या टॉससाठी दोन्ही संघांचे कर्णधार संध्याकाळी 6 वाजता मैदानात येतील.  टॉस झाल्यावर 30 मिनिटांनी म्हणजेच संध्याकाळी 6.30 वाजता सुरु होणार आहे. 
 
भारतीय संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्रकर, राजेश्वरी गायकवाड.


ऑस्ट्रेलिया संघ: मेग लॅनिंग (कर्णधार), अॅलिसा हिली, डी'आर्सी ब्राउन, ऍशले गार्डनर, किम गर्थ, हीदर ग्रॅहम, ग्रेस हॅरिस, जेस जॉन्सन, अलाना किंग, ताहिला मॅकग्रा, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहम.