Sunil Gavaskar On Ravi Ashwin : र्ल्ड कपचा फायनल सामना (World Cup Final) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. हे मैदान खासकरून स्पिनर्ससाठी ओळखलं जातं. त्यामुळे आता फायनलमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाच्या रणनितीमध्ये बदल करून फायनलसाठी स्टार आर आश्विनची (R Ashwin) संघात एन्ट्री करणार का? असा सवाल विचारला जात आहे. चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात (IND vs AUS) आश्विनने उत्तम गोलंदाजी केली होती. त्याने ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगला रोखून धरलं होतं. त्याने 10 ओव्हरमध्ये फक्त 31 धावा देत एक गडी बाद देखील केला होता. तर एक ओव्हर मेडन टाकून ऑस्ट्रेलियाच्या भोवती घावा घातला. त्यामुळे आता फायनलमध्ये त्याला संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर आता लिटिल मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका कार्यक्रमात सुनील गावस्कर आणि 1983 चे वर्ल्ड कप स्टार मदनलाल यांना बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी या दोन्ही खेळाडूंना या प्रश्नावर आपलं मत मांडलं. आश्विनला खेळवायचं की नाही, हे पूर्णपणे पिच कंडिशनवर अवलंबून असेल. पिचवर स्पिनर्ससाठी मदत होणार असेल तर आश्विनचा विचार केला जाऊ शकतो. मात्र, मला वाटत नाही की आश्विनला संघात स्थान मिळू शकतं, असं मदनलाल यांनी म्हटलं आहे.


मदनलालच्या यांच्या या वक्तव्याला सुनील गावस्कर यांनी देखील समर्थन दिलं आहे. आश्विनला खेळवायचं असेल तर मोहम्मद सिराजला संघाबाहेर ठेवावं लागेल. अशी परिस्थिती भारतावर येणार नाही, सर्वकाही पिचवर अवलंबून असेल. भारतीय संघाने आत्तापर्यंत संघात जास्त बदल केले नाहीत, त्यामुळे आता फायनल सामन्यात संघ बदलणार नाही, असं मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे. 


आणखी वाचा - 'पंतप्रधानांनी मला विचारलं...', जावई कॅप्टन झाल्यावर शाहिद आफ्रिदी स्पष्टच म्हणाला 'मी लॉबिंग करत नाही पण...'


दरम्यान, हार्दिक पांड्या जखमी झाल्यानंतर टीम इंडियामध्ये मोठा बदल करण्यात आला होता. इशान किशनला पुन्हा बाकावर बसवून सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमीला संधी देण्यात आली होती. त्यानंतर टीम इंडियाची नशीब चमकलं. शमीने टीम इंडियासाठी विजय खेचून आणले अन् आता संघ वर्ल्ड कपपासून फक्त एक पाऊल लांब आहे.