IND VS BAN 1st Test Match Rishabh Pant Century : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात टेस्ट सीरिज मधला पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवला जात आहे. या टेस्ट सामन्याचा शनिवारी तिसरा दिवस असून ऋषभ पंतने (Rishabh Pant) जबरदस्त फलंदाजी करून मैदानात कहर केला. अपघातानंतर जवळपास दोन वर्षांनी टेस्ट क्रिकेटमध्ये कमबॅक करणाऱ्या पंतने बांगलादेश विरुद्ध दणदणीत शतक ठोकले.  परंतू मैफनात उतरण्यापूर्वी ऋषभ पंतने त्याच्या बॅट सोबत काहीतरी खास केले. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेश विरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडिया सुरुवातीपासून मजबूत स्थितीत आहे. टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज मोठा समाधानकारक धावा करण्यात अपयशी ठरल्यावर ऋषभ पंत आणि शुभमन गिल या दोघांनी मोठी पार्टनरशिप करून टीम इंडियाची धावसंख्या 500 पार पोहोचवली. यात ऋषभ पंतने 128 बॉलमध्ये 109 धावा केल्या, हे त्याचे 6 वे शतक होते. या दरम्यान त्याने 13 चौकार आणि 4 सिक्स ठोकले. 


मैदानात उतरण्यापूर्वी पंतने बॅट सोबत नेमकं काय केलं?


तिसऱ्या दिवशी शुभमन गिल आणि ऋषभ पंत मैदानात फलंदाजीसाठी उतरले. यावेळी ऋषभने बॅटिंगला येण्यापूर्वी त्याची बॅट आणि संपूर्ण क्रिकेट किटची पूजा केली. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात पंत त्याची बॅट आणि इतर सामान समोर ठेऊन श्रद्धापूर्वक हात जोडताना दिसतोय. ऋषभ पंतचा हा अंदाज त्याच्या फॅन्सना खूप भावला आहे. 


व्हिडीओ : 



एम एस धोनीच्या 'या' विक्रमाशी बरोबरी : 


ऋषभ पंतने बांगलादेश विरुद्ध दणदणीत शतक ठोकून टीम इंडियाचा माजी विकेटकिपर आणि कर्णधार एम एस धोनीच्या (MS Dhoni ) विक्रमाशी बरोबरी केली आहे. एम एस धोनीने टीम इंडियाचा विकेटकिपर म्हणून टेस्ट क्रिकेटमध्ये एकूण 6 शतक लगावली. याच रेकॉर्डची शनिवारी ऋषभ पंतने बरोबरी केली. ऋषभ पंतने टेस्ट क्रिकेट कारकिर्दीत एकूण सहा शतक ठोकली आहेत. यामुळे पंतवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.