India vs Bangladesh 1st Test 2nd Day : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. चेन्नई येथे सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट दरम्यान टीम इंडियाचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाने 376 धावांची मोठी आघाडी घेतली होती. तर गोलंदाजीतही बांग्लादेशच्या संपूर्ण संघाला 149 धावांवर ऑल आउट करण्यात टीम इंडियाला यश आले. यादरम्यान मैदानात आकाश दीप सोबत एक असा प्रसंग घडला ज्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये बसलेले सर्वच खेळाडू खळखळून हसले. 


नेमकं काय घडलं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईत सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी टीम इंडिया फलंदाजीसाठी मैदानात उतरली. यावेळी रवींद्र जडेजाची विकेट पडल्यावर आकाश दीप फलंदाजीसाठी मैदानात आला. आकाश दीपची फलंदाजी सुरु असताना त्याने एक शॉट मारला आणि तो धाव घेण्यासाठी पळाला. यावेळी फिल्डिंग करत असलेल्या हसन महमूद याने स्टंपच्या दिशेने बॉल मारला, परंतु तो चुकून आकाश दीपच्या कमरेला लागला. बॉल कमरेला लागल्यावर आकाश दीप वेदनेने कळवळला. त्यावेळी टीम इंडियाचे फिजिओ सुद्धा तेथे धावत आले. 


आकाश दीपला लागलेल्या बॉलचा रिप्ले ड्रेसिंग रूमच्या बाहेर बसलेल्या टीम इंडियाच्या स्क्रीनवर सुद्धा दाखवण्यात आला. यावेळी विराट कोहलीने काहीतरी जोक मारला ज्यावर तेथे बसलेल्या सर्वांनाच हसू आवरले नाही. नेहमी गंभीर असणारा टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर सुद्धा विराटच्या या जोकवर खळखळून हसताना पाहायला मिळाला. 



आकाश दीपची घातक गोलंदाजी : 


शुक्रवारी बांगलादेशच्या टीमची फलंदाजी सुरु असताना नवव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर आकाश दीपने झाकीर हसन याला बोल्ड केले. यावेळी आकाशने टाकलेय बॉलचा वेग इतका जास्त होता की बॉल स्टंपवर आदळल्याने मिडल स्टंप तुटला.  त्यानंतर पुढच्याच बॉलवर आकाशने पुन्हा एकदा मोमिनुल हक याला बोल्ड आउट करून पॅव्हेलियनमध्ये धाडले. तिसऱ्या बॉलवर आकाश दीपकडे हॅट्रिक घेण्याची संधी होती मात्र यावेळी तो थोडक्यात चुकला आणि त्याची संधी हुकली. आकाश दीपने 23 फेब्रुवारी 2024 रोजी इंग्लंड विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.  


हेही वाचा : IND VS BAN Test : रोहित शर्मा दुसऱ्या इनिंगमध्येही फलंदाज म्हणून फ्लॉप, पण कॅप्टन म्हणून ठरला महान; केला मोठा पराक्रम


भारताची प्लेईंग 11:


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज


बांगलादेशची प्लेईंग 11: 


शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहि