IND VS BAN Test : रोहित शर्मा दुसऱ्या इनिंगमध्येही फलंदाज म्हणून फ्लॉप, पण कॅप्टन म्हणून ठरला महान; केला मोठा पराक्रम

बांगलादेश विरुद्ध दोन्ही इनिंगमध्ये फलंदाजीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा फ्लॉप ठरला. रोहित फलंदाजीत मोठा स्कोअर करण्यात अपयशी ठरला असला तरी त्याने कॅप्टन म्हणून एक मोठा पराक्रम केला आहे. 

पुजा पवार | Updated: Sep 20, 2024, 04:41 PM IST
IND VS BAN Test : रोहित शर्मा दुसऱ्या इनिंगमध्येही फलंदाज म्हणून फ्लॉप, पण कॅप्टन म्हणून ठरला महान; केला मोठा पराक्रम title=
(Photo Credit : Social Media)

IND VS BAN 1st match 2nd Day : चेन्नईत सुरु असलेल्या भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडिया वरचढ ठरल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाने अश्विन आणि जडेजाच्या जोरावर 376 धावांची आघाडी घेतली. तर दुसऱ्या दिवशी बांगलादेशला टीम इंडियाच्या घातक गोलंदाजी समोर 10 विकेट्स गमावून केवळ 149 धावाच करता आल्या. परंतु बांगलादेश विरुद्ध दोन्ही इनिंगमध्ये फलंदाजीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा फ्लॉप ठरला. रोहित फलंदाजीत मोठा स्कोअर करण्यात अपयशी ठरला असला तरी त्याने कॅप्टन म्हणून एक मोठा पराक्रम केला आहे. 

अशी कामगिरी करणारा ठरला पहिला कॅप्टन : 

रोहित शर्माने बांगलादेश विरुद्ध टेस्ट सामन्यापूर्वी 2024 या वर्षात आतापर्यंत खेळलेल्या 25 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 990 धावांची कामगिरी केली होती. तर त्याच्या तुलनेत इतर संघांच्या कर्णधारांना 600 धावांचा टप्पा सुद्धा गाठता आला नव्हता. बांगलादेश विरुद्ध टेस्ट सामन्यात रोहितच्या बॅटमधून समाधानकारक धावा निघाल्या नसल्या तरी पहिल्या सामन्यात 6 तर दुसऱ्या सामन्यात 5 धावा करून रोहित शर्मा 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद 1 हजार धावांचा टप्पा गाठणारा सध्याच्या घडीला एकमेव कॅप्टन ठरला आहे. 

हेही वाचा : IND VS BAN Test : आकाश दीपचा 'स्टंप तोड' परफॉर्मन्स! हॅट्रिकचा चान्स हुकला पण बांगलादेशचे वाजवले बारा Video

 

भारताची प्लेईंग 11:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज

बांगलादेशची प्लेईंग 11: 

शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा