पर्थ : T20 WC 2022 Points Table ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने (India vs Bangladesh) बांगलादेशचा 5 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने (Team India) स्पर्धेत तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे. तसेच या विजयानंतर टीम इंडियाचा सेमी फायनलचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. बांगलादेश (Bangladesh)  विरूद्ध टीम इंडियाच्या विजयानंतर आता पॉईट्स टेबलचं गणित देखील बदलल आहे. त्यामुळे नेमक कस समीकरण असणार आहे. आणि कोणता संघ सेमी फायनल गाठणार आहे. हे जाणून घेऊयात. 


 ग्रुप-2 पॉईट्स टेबल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेश विरूद्ध विजयानंतर टीम इंडिया ग्रुप 2 च्या पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. टीम इंडियाचे 4 सामन्यात 6 गुण आहेत. आता टीम इंडियाला झिम्बाब्वेविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे. हा सामना जिंकल्यास ते उपांत्य फेरीत सहज पोहोचतील. भारताचा रन-रेटही खूप चांगला आहे, त्यामुळे आता त्यांना चिंतेचे कारण नाही. 


दरम्यान टीम इंडियाच्या या विजयामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे.  कारण आता त्यांच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशाही मावळल्या आहेत.टीम इंडियानंतर पॉईंट्स टेबलमध्ये दक्षिण आफ्रिकेचे तीन सामन्यांतून पाच गुण आहेत. आता जर दक्षिण आफ्रिकेने (South Africa) उरलेल्या दोन सामन्यांमध्ये एक सामना जिंकला तर ते सेमी फायनलमध्ये (Semi Final) प्रवेश करतील. त्यामुळे ग्रुप-2 मधील भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ सेमी फायनल गाठण्याची प्रबळ दावेदार मानली जात आहे. 


 


 


 


टीम


 

सामने

जिंकले

हरले

पॉइंट्स

नेट रन रेट

भारत

4

3

1

6

+0.730

साऊथ आफ्रीका

3

2

0

5

+2.772

बांगलादेश

4

2

2

4

-1.276

झिंबाब्वे

4

1

2

3

-0.313

पाकिस्तान

3

1

2

2

+0.765

नेदरलँड्स

4

1

3

2

-1.233


 ग्रुप-1 पॉईट्स टेबल


टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup)  ग्रुप 1 मधील समीकरणाबाबत बोलायचं झालं तर, सेमी फायनलची शर्यंत खुपच रंजक होणार आहे. कोणता संघ उपांत्य फेरीत पोहोचणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सर्वंच संघाचे 4-4 सामने पार पडले आहेत, मात्र अद्याप सेमी फायनल कोण गाठणार हे स्पष्ट झालं नाही आहे. न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला सेमी फायनलमध्ये जाण्याची चांगली संधी आहे.


टीम

मॅच

जिंकले

हरले

पॉइंट्स

नेट रन रेट

न्यूझीलंड

4

2

1

5

+2.233

इंग्लंड

4

2

1

5

+0.547

ऑस्ट्रेलिया

4

2

1

5

-0.304

श्रीलंका

4

2

2

4

-0.457

आयरलंड

4

1

2

3

-1.544

अफगाणिस्तान

4

0

2

2

-0.718


 


असा रंगला सामना


आजच्या सामन्यात टीम इंडियाने (India vs Bangladesh) बांगलादेशला 185 रन्सचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या बांगलादेशच्या बँटींग दरम्यान  पाऊस आल्याने हे टार्गेट कमी करून 151 इतकंच करण्यात आलं होतं. त्यामुळे पावसानंतर खेळ सुरु झाला त्यावेळी बांगलादेशला 54 बॉल्समध्ये 85 रन्स करण्याचं आव्हान दिलं होतं. यावेळी टीम इंडियाच्या (Team India) बॉलर्सनी कमबॅक करत बांगलादेशचा (Bangladesh) 5 धावा राखत पराभव केला.