IND vs BAN: 14 वर्षांनंतर टीम इंडिया खेळणार `या` शहरात सामना!
IND vs BAN, 1st T20I: नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेनंतर भारत आणि बांगलादेश टी-२० मालिकेत आमनेसामने येणार आहेत. T20I मालिकेतील पहिला सामना अशा शहरात खेळवला जाणार आहे जिथे टीम इंडिया तब्ब्ल 14 वर्षांनंतर खेळणार आहे.
India vs Bangladesh: भारत आणि बांगलादेशचे क्रिकेट संघ आता 3 सामन्यासह T20I मालिकेत आमनेसामने येणार आहेत. हे सामने 6 ऑक्टोबरपासून खेळवले जाणार आहे. ग्वाल्हेरमधील श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियममध्ये हे हा सामना खेळवला जाणार आहे. तब्ब्ल 14 वर्षांनंतर ग्वाल्हेरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. त्या स्टेडियमवर 2010 साली भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात येथे शेवटचा सामना झाला होता. त्या सामन्यात सचिन तेंडुलकरने द्विशतक झळकावून इतिहास रचला होता. त्यावेळी तो 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये द्विशतक झळकावणारा जगातील पहिला फलंदाज ठरला होता. तो सामना शेवटचा ठरला. आता 14 वर्षांनंतर तिथे आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे.
नवीन स्टेडियममध्ये खेळवला जाणार सामना
14 वर्षांपूर्वी जो सामना ग्वाल्हेरमध्ये खेळवण्यात आलेला तो कॅप्टन रूपसिंग स्टेडियममध्ये होता. यानंतर आता 14 वर्षांनंतर ग्वाल्हेरमधील एका नवीन स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियम असं या स्टेडियमचं नाव आहे. या वर्षी जूनमध्ये याचे काम पूर्ण झाले आहे. आता प्रथमच या स्टेडियम क्रिकेटचा सामने आयोजित केले जाणार आहे. ग्वाल्हेर हे भारतातील एकमेव ठिकाण आहे जिथे यजमान संघ सलग दोन दिवस सामने खेळला आहेत.
हवामान कसे असेल?
भारत-बांगलादेश कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्याच्या वेळी पावसामुळे बराच व्यत्यय आला होता. याच कारणांमुळे T20I मालिका सुरू होण्यापूर्वी सर्वांच्या नजरा हवामान अंदाजाकडे लागल्या आहेत. एक्यूवेदरनुसार, श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियममध्ये 6 ऑक्टोबरच्या संध्याकाळी हवामान स्वच्छ असेल. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही.
हे ही वाचा: भारतीय ड्रेसिंग रूममध्ये जेमिमाह रॉड्रिग्सला मिळाले खास मेडल, Video Viral
कसे असतील दोन्ही संघ?
भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव.
हे ही वाचा: Video: रिंकू सिंगच्या हातावर पाच षटकारांची खूण, बघा स्टार क्रिकेटरचा अनोखा टॅटू
बांग्लादेश : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झीद हसन तमीम, परवेझ हुसेन आमोन, तौहीद हृदोय, महमूद उल्लाह, लिटन कुमेर दास, जाकर अली अनिक, मेहदी हसन मिराज, शाक महेदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, तंजीम हसन साकिब, रकीबुल हसन.