ICC महिला T20 विश्वचषक 2024 ची सुरुवात झाली आहे. भारतीय संघाने 4 ऑक्टोबर रोजी दुबईच्या मैदानावर न्यूझीलंड संघाविरुद्ध पहिला सामना खेळला. या सामन्यात टीम इंडियाला 58 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने 20 षटकांत 160 धावा केल्या, तर भारतीय टीमने लक्ष्याचा पाठलाग करताना 19 षटकांत केवळ 102 धावा केल्या. या सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारतीय महिला संघातील खेळाडू निराश झाले होते. मात्र, बीसीसीआयने खेळाडूंना नवी प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला आहे. या संदर्भात त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये भारतीय पुरुष संघाप्रमाणेच महिला संघातही प्रत्येक सामन्यातील सर्वोत्तम बेस्ट फील्डरला मेडल देण्याची परंपरा सुरू झाली आहे. यामध्ये पहिले मेडल खेळाडू जेमिमाह रॉड्रिग्सला मिळाले आहे.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भारतीय महिला संघाचे फिल्डिंग प्रशिक्षक मुनीश बाली यांनी सर्व खेळाडूंना संबोधित केले. यानंतर त्यांनी सामन्यादरम्यान बेस्ट फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी सामन्यादरम्यान स्मृती मंधानाने घेतलेल्या झेलचेही कौतुक केले. यानंतर शेवटी जेमिमाहचे नाव हे सर्वोत्तम बेस्ट फील्डर पदक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या नावाची घोषणा केली. जेमिमाला हे पदक देण्यासाठी त्याने कॅप्टन हरमनप्रीत कौरला बोलावले. जेमिमाहला जेव्हा हे पदक देण्यात आले तेव्हा ती भावूक झाली.
सामन्यात दारुण पराभवानंतर भारतीय महिला संघासाठी उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग अवघड झाला आहे. आता उरलेल्या सामन्यांमध्ये टीम इंडिया शानदार कामगिरी दाखवेल, असा विश्वास जेमिमाहने व्यक्त केला आहे. भारतीय संघाचा पुढचा सामना पाकिस्तानी महिला संघाविरुद्ध ६ ऑक्टोबर रोजी दुबईतील त्याच मैदानावर खेळवला जाणार आहे.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
RCB
(20 ov) 201/8
|
VS |
RR
202/4(18 ov)
|
| Rajasthan Royals beat Royal Challengers Bengaluru by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
OMA
(50 ov) 218/9
|
VS |
NAM
223/9(49.3 ov)
|
| Namibia beat Oman by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
KKR
(20 ov) 181/4
|
VS |
LSG
182/7(20 ov)
|
| Lucknow Super Giants beat Kolkata Knight Riders by 3 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.