मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी, त्यानंतर टी 20 त्यानंतर वन डे सीरिज दोन मालिका खिशात घातल्यानंतर पहिला वन डे सामना देखील भारतीय संघानं जिंकला आहे. उर्वरित दोन सामने जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. या सामन्यात काही नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघानं 50 ओव्हरमध्ये 317 धावा केल्या आणि इंग्लंड संघासमोर कडवं आव्हान उभं केलं. इंग्लंड संघावर 66 धावांनी मात करत भारतीय संघानं विजय मिळवला आहे. 251 धावांवर इंग्लंडचे सर्व गडी बात झाले. या अभूतपूर्व विजयामागे नेमकी कोणती 5 मोठी कारणं आहेत जाणून घेऊया.


टीम इंडियाची तुफान गोलंदाजी
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल कामगिरी केली. इंग्लंडच्या फलंदाजांना एकामागे एक तंबूत धाडण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 


3 सामने एक ओव्हर 2 विकेट्स, जगभरात टीम इंडियाच्या 'या' गोलंदाज हिरोची चर्चा


शार्दूल आणि कृष्णाचा मोठा वाटा
शार्दुल ठाकूरनं एका ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेतले तर कृष्णाने 4 जणांना तंबुत धाडलं. त्यांच्या वेगवान गोलंदाजीसमोर इंग्लंड संघाला नमतं घ्यावं लागलं.


राहुल, कृणाल पांड्या, विराटची तुफान फलंदाजी
शिखर धवनने 98, लोकेश राहुलने नाबाद 62, कृणाल पंड्याने नाबाद 58 आणि कर्णधार विराट कोहलीने 56 धावा केल्या. केवळ शिखर धवनच नाही तर इतर फलंदाजांनीही शानदार कामगिरी बजावली. सामना पुढे गेला तसतसा संघाची स्कोअरही वेगाने वाढली.


Ind vs Eng 1st ODI: कृणाल पांड्याची सटकली, इंग्लंडच्या खेळाडूशी भिडला, व्हिडीओ


 धवनचं शतक हुकलं पण विजयाचा पाया रचला
शिखर धवनने टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. शिखर धवनने आपले शतक दोन धावांनी गमावले. उर्वरित फलंदाजांसाठी त्याने मजबूत स्थान निर्माण केले होते. याचा परिणाम असा झाला की उर्वरित फलंदाजांनीही चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर टीम इंडियाने मोठी धावसंख्या उभारली.


इंग्लंडचे फलंदाज कमी पडले
इंग्लंडने सुरुवात जबरदस्त केली मात्र जसा खेळ पुढे सरकत होता तेव्हा त्यांना हा टेम्पो टिकवता आला नाही. पहिल्या दोन विकेट्स गेल्यानंतर उर्वरित संघ एकामागेएक तंबूत परतला. शुभमन गिल, कृष्णा, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादवच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडचे संघ कमी पडले.