3 सामने एक ओव्हर 2 विकेट्स, जगभरात टीम इंडियाच्या 'या' गोलंदाज हिरोची चर्चा

या गोलंदाजाचा टीम इंडियात जलवा! टी 20 नंतर वन डेमध्ये धुरळा

Updated: Mar 24, 2021, 09:44 AM IST
3 सामने एक ओव्हर 2 विकेट्स, जगभरात टीम इंडियाच्या 'या' गोलंदाज हिरोची चर्चा title=

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड वन डे सीरिजमधील पहिला सामना नुकताच पुण्यात पार पडला. या सामन्यात 66 धावांनी टीम इंडियाचा विजय झाला आहे. भारतीय संघातील एका गोलंदाजानं आपली दमदार कामगिरी कायम राखल्याचं पाहायला मिळालं. त्याच्या या कामगिरीची मैदानावरच नाही तर जगभरात चर्चा होत आहे. या गोलंदाजानं एका ओव्हरमध्ये सलग दोन विकेट्स घेतल्या. असं एकदा नाही तर तीन सामन्यांमध्ये अशा पद्धतीनं विकेट्स घेण्याचा विक्रम या गोलंदाजानं केला आहे.

हा गोलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून टीम इंडियातील वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने सलग तीन सामन्यात तिसऱ्यांदा विक्रम केला. या पराक्रमाचा मोठा फायदा टीम इंडियाला झाला आहे.

शार्दुलच्या कामगिरीसाठी त्याला 'सामनावीर' सन्मानही देण्यात आला. त्याच्या या पराक्रमामुऴे ट्विटरवर हिरो बनला आहे. शार्दुल ठाकूरने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात एकाच ओव्हरमध्ये इयोन मॉर्गन आणि जोस बटलरच्या विकेट घेतल्या आणि बाजी पलटवली.

Ind vs Eng: टीम इंडियाला मोठा धक्का, 2 मोठे खेळाडू वन डे सीरिजमधून बाहेर जाण्याची शक्यता

पहिल्या वन डे सामन्यादरम्यान 25 व्या ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवर शार्दुल ठाकूरने इयोन मॉर्गनला कॅच आऊट केलं. त्यानंतर, त्याच ओव्हरच्या चौथ्या बॉलवर जोस बटलर एलबीडब्ल्यू आऊट केलं. शार्दुल ठाकूरने एकाच ओव्हरमध्ये 2 बळी घेऊन बाजी पलटवली.

Ind vs Eng 1st ODI: कृणाल पांड्याची सटकली, इंग्लंडच्या खेळाडूशी भिडला, व्हिडीओ

शार्दूल ठाकूरनं यापूर्वी भारत विरुद्ध इंग्लंड अहमदाबाद इथे चौथ्या आणि पाचव्या टी 20 सामन्यात एकाच ओव्हरमध्ये 2 बळी घेण्याचा विक्रम केला होता. 20 सामन्यात शार्दूलनं एकाच ओव्हरमध्ये चौथ्या सामन्यात इयोन मॉर्गन आणि बेन स्टोक्स तर पाचव्या सामन्यात डेव्हिड मलान आणि जॉनी बेयरस्टोची विकेट घेतली होती.