चेन्नई: भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत दुसरा कसोटी सामना उद्यापासून सुरू होत आहे. 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान हा सामना चेन्नईमध्ये खेळवला जात आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज जखमी झाल्यामुळे दुसऱ्या सामन्यात तो खेळू शकणार नाही. त्यामुळे भारतासाठी दिलासा देणारी बातमी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या कसोटीत टीम इंडियाला 227 धावांनी नमवणाऱ्या इंग्लंड संघाला दुसर्‍या कसोटीपूर्वी धक्का बसला. इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुसर्‍या कसोटी सामन्याआधी बाहेर पडला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने गुरुवारी ही माहिती दिली आहे. 


दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर भारत विरुद्ध इंग्लंड संघात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. कोपराच्या दुखापतीमुळे जोफ्रा आर्चरला आता इंजेक्शन घ्यावं लागलं आहे, ज्यामुळे वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. 


Ind vs Eng 2nd test: टीम इंडिया 'या' 11 दमदार खेळाडूंसह उतरणार मैदानात


चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा संघ आता 1-0 ने आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत आर्चरच्या अनुपस्थितीमुळे इंग्लंड संघाला दुसर्‍या कसोटीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तर दुसरा वेगवान गोलंदाज अॅन्डरसनला देखील संघाबाहेर ठेवणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. दोन्ही गोलंदाज संघाबाहेर असतील तर भारतीय संघासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. 


भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघानं भारताला 227 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. आर्चर संघाबाहेर गेल्यानंतर संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला त्याचे स्थान मिळू शकत अशी चर्चा आहे.