Ind vs Eng 2nd test: टीम इंडिया 'या' 11 दमदार खेळाडूंसह उतरणार मैदानात

Ind vs Eng: इंग्लडविरुद्ध उद्या दुसऱ्या कसोटीचा महामुकाबला

Feb 12, 2021, 12:37 PM IST
1/11

रोहित शर्मा

रोहित शर्मा

भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिल्याच सामन्यात रोहित शर्मानं चांगली कामगिरी केली नाही. अवघ्या 6 आणि 12 धावा काढून तंबूत माघारी परतला. 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारतानं खेळलेल्या कसोटी मालिकेत रोहित शर्माने तीन शतके ठोकली होती. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत रोहितने सर्वाधिक 529 धावा केल्या आणि सामनावीर ऑफ द सीरिजचा पुरस्कार जिंकला. आता इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात रोहित शर्मा पहिल्या कसोटीत झालेलं नुकसान भरुन काढण्याच्या तयारीत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला धूळ चारण्यासाठी रोहित शर्मा सज्ज आहे. 

2/11

शुभमन गिल

शुभमन गिल

दुसर्‍या कसोटी सामन्यात रोहित शर्मासह शुभमन गिल सलामीला जाईल. हे दोन्ही फलंदाज वेगाने धावा करण्यास तज्ज्ञ आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये शुभमन गिल यशस्वी झाला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने अर्धशतकही ठोकले होते.

3/11

चेतेश्वर पुजारा

चेतेश्वर पुजारा

चेतेश्वर पुजारा 3 व्या क्रमांकावर फलंदाजीस उतरेल. दुसर्‍या कसोटीत पुजारा इंग्लंडविरुद्ध खेळला तर भारतीय संघाला पहिली कसोटी जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

4/11

विराट कोहली

विराट कोहली

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या डावात कोहलीने 72 धावा केल्या. इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात विराट कोहली सामना जिंकू शकतो.   

5/11

अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे

उपकर्णधार अजिंक्य रहाणे पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये शतकी खेळी केल्यापासून रहाणे कोणतेही मोठे डाव खेळला नाही. रहाणे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातही फ्लॉप होता. आता रहाणे दुसर्‍या कसोटी सामन्यात तुफान फटकेबाजी करण्यासाठी सज्ज आहे. 

6/11

ऋषभ पंत

ऋषभ पंत

विकेटकीपर ऋषभ पंत फलंदाज म्हणून 6 व्या क्रमांकावर उतरणार आहे. विकेटकिपिंगसाठी थोड्या सुधारणा केल्यास संघाला आणखीन मजबुती मिळू शकते. 

7/11

वॉशिंगटन सुंदर

वॉशिंगटन सुंदर

ऑलराऊंडर सुंदर सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणार आहे. ऑफ ब्रेक गोलंदाजीसह फलंदाजीतही तरबेज असलेला सुंदर दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला पराभूत करण्यासाठी तयार आहे.   

8/11

रविचंद्रन अश्विन

रविचंद्रन अश्विन

स्पिनर अश्विननंही दुसऱ्या सामन्यासाठी कंबर कसली आहे. इंग्लंडच्या फलंदाजांना माघारी धाडण्यासाठी आणि गोलंदाजांवर नामूष्की आणण्यासाठी तयार आहे. 

9/11

अक्षर पटेल

अक्षर पटेल

शहाबाज नादीमला दुसऱ्या सामन्यात संधी देण्यात आली नाही. अक्षर पटेल दुसऱ्या सामन्यासाठी खेळणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला घाम फुटणार आहे. स्पिनर गोलंदाज अक्षर पटेलच्या खेळण्यानं भारतीय संघाला मजबुती मिळणार आहे. 

10/11

जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराहवर बॉलिंग अॅटॅकची कमान आहे. इंग्लंड संघातील खेळाडूंच्या दांड्या गूल करण्यासाठी बुमराहने तयारी केली आहे. 

11/11

इशांत शर्मा

इशांत शर्मा

दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून इशांत शर्मा जसप्रीत बुमराहला साथ देईल. पहिल्या कसोटी सामन्यात इशांत शर्माने 3 गडी बाद केले.