Ind vs Eng Shubman Gill in Martahi : भारत आणि इंग्लंड विरुद्ध  दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे सुरु आहे. विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या डावात भारताचा खेळाडू शुभमन गिल याला भारतासाठी काही विशेष खेळता आलं नाही. शुभमन अवघ्या 34 धावा करुन बाद झाला. त्यामुळे तो खराब फॉर्ममधून जात असल्याची प्रतिक्रीया उमटू लागली. एवढचं नाही तर जेम्स अँडरसनने शुभमनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. शेवटच्या कसोटीतही तो स्वस्तात बाद झाला होता. मात्र आज दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवशी म्हणजेच तब्बल 11 महिन्यानंतर आणि 13 डावांनंतर शुभमनची बॅट तळपताना दिसली. खराब फॉर्ममधून जात असलेल्या गिलसाठी ही खेळी खूप महत्त्वाची आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि इंग्लंड विरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलने 13 डावांनंतर पहिले अर्धशतक झळकावले आहे. तर भारत दुसऱ्या डावात फलंदाजीला आला तेव्हा तिसऱ्या दिवशी दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी 28 धावा करत खेळाला सुरुवात केली. पण अर्ध्या डावात जेम्स अँडरसनने एका शानदार चेंडूवर क्लीन बोल्ड केले आणि त्यानंतर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातील द्विशतक झळकवणारा यशस्वीची विकेट घेतली. भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या शुभमन गिलसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा होता. 


कारण गेल्या 13 डावांमध्ये शुभमन गिलच्या बॅटमधून एकही अर्धशतक झाले नव्हते. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात केवळ 34 धावा करुन बाद झाला होता. त्यानंतर गिलवार बरीच टीका झाली आणि चाहते त्याला संघातून काढून टाकण्याची मागणी करत होते. पण जेव्हा इंग्लंडविरुद्ध कठीण परिस्थितीत गिलचे हे अर्धशतक त्याच्या टीकाकरांना सडेतोड उत्तर देणारे होते. गिलचे हे अर्धशतक अवघ्या 52 चेंडुत झळकले. आता तो आपल्या अर्धशतकाचे शतकात रूपांतर करेल अशी अपेक्षा आहे. 


13 डावात पहिले अर्धशतक


जेव्हा गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला मैदानात उतरा तेव्हापासून तो सतत धावा काढण्यासाठी धडपडत होता. गिलने यापूर्वी खेळलेल्या 12 डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावले नव्हते. पण इंग्लंडविरुद्ध हे अर्धशतक त्याला थोडा आत्मविश्वास देईल.


यापूर्वी विशाखापट्टणममध्ये भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये युवा यशस्वी जैस्वालने भारतासाठी शानदार द्विशतक झळकावले. भारताने पहिल्या कालावधीत 396 छापे टाकले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात केवळ 253 धावा केल्या. भारताकडून यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 6 विकेट घेतल्या.


अकरा महिन्यांनंतर शुभमनने झळकावले शतक


शुभमनने यापूर्वी मार्च 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले होते. त्याने 235 चेंडूंचा सामना करताना त्याने 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 128 धावा केल्या होता. यानंतर खेळलेल्या 12 डावांमध्ये त्याची बॅट शांत राहिली. त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. त्याने 12 धावा, 13, 18, 6, 10, 29*, 2, 26, 36, 10, 23, 0, 34 धावा केल्या. हैदराबादचे स्टेडियम शून्यावर बाद झाला त्यामुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागले.