मुंबई: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपआधी न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड दोन कसोटी सामन्यांची सीरिज खेळवली जात आहे. या सीरिजनंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड WTC 2021साठी अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान होणार आहे. या सामन्याआधी न्यूझीलंडच्या फलंदाजाने सौरव गांगुली (दादा) यांचा इंग्लंडच्या ग्राउंडवर रेकॉर्ड तोडून इतिहास रचला. तर टीम इंडियाला त्याने आव्हान दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2 सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज डेवॉन कॉनवे शानदार शतक झळकावलं. आश्चर्यकारक गोष्ट अशी होती की हा कॉनवेचा पहिला कसोटी सामना होता. त्याने पहिल्याच दिवशी 136 धावा करून नॉट आऊट राहिला आहे. त्याच्या शतकी खेळीमुळे पहिल्या दिवसाअखेर न्यूझीलंड संघाने 3 गडी गमवून 246 धावा केल्या होत्या. हा सामना लॉर्ड्सवर सुरू आहे. 


कॉनवेनं तोडला दादाचा रेकॉर्ड


लॉर्ड्सच्या मैदानावरून पदार्पण करताना कॉनवेनं नुसतं शतक ठोकलं नाही तर दादाचा रेकॉर्ड देखील तोड टीम इंडियाला आव्हान दिलं आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी 1996मध्ये या मैदानावर कसोटीमध्ये डेब्यू करत 131 धावांची खेळी केली होती. त्यांचा हाच रेकॉर्ड कॉनवेनं मोडला. न्यूझीलंडच्या कॉनवेनं कसोटीमध्ये डेब्यू करत नाबाद 136 धावा सामन्याच्या पहिल्या दिवशी केल्या आहेत. 


इंग्लंडमधील पहिल्या सामन्यात असा शानदार डाव खेळणारा कॉनवेदेखील भारताविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अडचण निर्माण होऊ शकतो. कॉनवेने आतापर्यंत तिन्ही स्वरूपात न्यूझीलंडचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून चर्चेत आहे. इंग्लंडमध्ये येण्यापूर्वी त्याने असेही म्हटले होते की भारतीय स्पिनर्सशी सामना करण्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या बॉलर्सवर त्याला धावा करण्यापासून रोखण्याची मोठी जबाबदारी असेल.