टीम इंडियाचा खेळाडू आणि सॅम आमनेसामने, कोहलीची मध्यस्ती, नक्की काय झालं?
टीम इंडियाचा खेळाडू आणि सॅम यांच्यात हायवोल्टेज ड्रामा, कोहलीला करावी लागली मध्यस्ती
नॉटिंगघम: भारत विरुद्ध इंग्लंड 5 कसोटी मालिकांच्या सीरिजमधील पहिला कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या कसोटी सामन्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. पहिल्या कसोटी सामना कोण आपल्या नावावर करणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. पण त्याआधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे टीम इंडियामधील खेळाडू पुन्हा दुसऱ्यांदा मैदानात भिडला आहे. यावेळी मैदानात हायवोल्टेज ड्रामा झाला. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला मध्यस्ती करत प्रकरण शांत करण्याची वेळ आली आहे.
मोहम्मद सिराज तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या दोन खेळाडूंसोबत भिडला त्यानंतर पुन्हा एकदा सॅमसोबत त्याचा वाद झाला. ऑलराऊंडर सॅम आणि सिराज पुन्हा एकदा मैदानात भिडले. त्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. करन क्रिझवर फलंदाजी गार्ड घेण्यासाठी खूप वेळ लावत होता. त्यामुळे करनच्या या कृतीवरून सिराजला खूप राग आला.
रागाच्या भरात सिराजने एक जबरदस्त बाउन्सर टाकला. त्यानंतर करनजवळ येऊन तो काहीतरी बडबडला. हा वाद वाढू नये म्हणून यावेळी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला मध्यस्ती करावी लागली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. ट
यापूर्वी सिराज डॉम सिब्ली आणि फास्ट बॉलर जेम्स एन्डरसनसोबत भिडला होता. करनने सिराजला जास्त भाव न दिल्याने सिराज आणखी संतापला. मैदानातील तणाव वाढू नये म्हणून विराट कोहलीनं अखेर मध्यस्ती केली आणि प्रकरण शांत केलं.
चौथ्या दिवस अखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात 303 धावा केल्या. इंग्लंड संघाला धावांचा डोंगर करण्यापासून रोखण्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांना यश आलं आहे. आता पाचव्या दिवसाचा सामना सुरू होणार आहे. जसप्रीत बुमराहने 5 विकेट्स घेतल्या आहेत. भारताला विजयासाठी 209 धावांचं लक्ष्य आहे. त्यामुळे पहिला कसोटी सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.