IND vs ENG Test series : भारत आणि इंग्लंड यांच्यात नूकताच पाच कसोटी सामन्यांची मालिका पार पडलेली आहे. टीम इंडियाने ही मालिका 4-1 च्या फरकाने आपल्या नावावर केली आहे. यावर भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने याने ट्विट केलेय आणि टीम इंडियाच्या या 2 खेळाडूंचे तोंड भरून कौतुक केलेले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत अनेक विक्रम केले गेले. धरमशाला येथे झालेल्या या मालिकेतील शेवटच्या सामन्यात असाच एक विक्रम झाला होता, ज्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. भारतीय आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी भरपूर चौकार आणि षटकार मारले. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात धर्मशाला येथे पाचवी टेस्ट मॅच खेळली गेली, आणि भारताने इंग्लंडचा तब्बल एक इनिंग आणि 64 धावांनी पराभव केला. पहिल्या इनिंगमध्ये इग्लंडने 218 धावा केल्या होत्या, पण यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांनी 477 धावांचा ऊंच डोंगर उभारून इंग्लंडच्या संघाच्या जिंकण्याच्या आशा समाप्त केल्यात. दुसऱ्या इनिंगनध्ये आश्विनने इंग्लंडच्या फलंदाजांनी मैदानावर जास्त वेळ टिकून दिले नाही. यासोबतच शेवटची टेस्ट सहजरीत्या आपल्या खिशात टाकली. या मॅचसोबतच पाच मॅचेसची सिरीज धर्मशाला येथे संपली.


पाचवी टेस्ट मॅच संपताच सचिन तेंडूलकर याने ट्विट केले होते, आणि त्यात असे म्हटले होते की, "पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पराभव पत्करूनही दमदार पुनरागमन करत 4-1 च्या फरकाने मालिका आपल्या नावावरुन करून घेतली आहे. संपूर्ण मालिकेदरम्यान मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा टीम इंडियाने उचलला आहे. कुलदीप यादव आणि रविचंद्रन अश्विन यांनी धर्मशाला येथे इंग्लंडवर मिळवलेल्या या शानदार विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.


अश्विन-कूलदीपच्या जोडीसमोर इंग्लंडचे फलंदाज गप्प


धर्मशाला येथे झालेल्या पाचव्या टेस्ट मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये कूलदीप यादवने आपल्या फिरकीची जादू दाखवली. कूलदीपने या मॅचमध्ये एकूण 5 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच दूसऱ्या इनिंगमध्ये भारताचा अनूभवी ऑफ स्पीनर रविचंद्रन अश्विननेसूद्धा आपल्या फिरकीचा कमाल दाखवत, इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीवर नाचवले होते. 


विरेंद्र सहवागने सूद्धा केले ट्विट


धर्मशाला टेस्ट मॅचनंतर भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सहवागने ट्विट केले होते आणि त्यात लिहीले की, " बॅझबॉल, बत्तीगूल. दुसऱ्या टेस्ट सामन्यानंतर इंग्लंडची स्थिती वाईट होती. कर्णधाराची अयशस्वी कामगिरी आणि संघातील गोंधळ यामुळे त्यांची अडचण आणखी वाढली. बॅझबॉलमध्ये आवश्यक असलेल्या शैली आणि रणनीती यांचा अभाव दिसून आला."