मुंबई: भारतीय संघाने चॅम्पियनशिप गमवल्यानंतर खूप टीका होत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज 4 ऑगस्टपासून खेळवण्यात येणार आहे. ही सीरिज टीम इंडियाला जिंकणं फार महत्त्वाचं आहे. त्याच पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला कोणतीही चूक पुन्हा करणं परवडणार नाही. अशा परिस्थितीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


या खेळाडूची संघातून होणार सुट्टी?


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यातीलचेतेश्वर पुजाराने 8 आणि 13 धावा केल्या. पुजाराच्या या कामगिरीनंतर कसोटी सामन्यातील कारकीर्द धोक्यात येण्याची शक्यता आहे. पुजाराची फलंदाजी किवी संघाच्या बॉलर्ससमोर कमी पडली. इतकच नाही तर गेल्या काही कसोटी मालिकांमध्ये पुजाराची कामगिरी विशेष नव्हती. 


आता पुजाराच्या तिसर्‍या क्रमांकाच्या जागेविषयीही प्रश्न उपस्थित होत आहेत. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या अखेरच्या दौऱ्यात 2 वर्षांपूर्वी चेतेश्वर पुजाराने अखेर शतक झळकवलं होतं. त्यानंतर पुजाराने सिडनीमध्येच 193 धावा केल्या होत्या. या खेळीनंतर त्याने एकही शतक ठोकलेले नाही, जे टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या पुजाराऐवजी के एल राहुल हा एक चांगला पर्याय असू शकतो असंही मत तज्ज्ञांचं मत आहे. 


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल नंतर आता भारतीय संघाला ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये 5 कसोटी सामने खेळवले जाणार आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना 4 ते 8 ऑगस्ट दरम्यान नॉटिंघॅम इथे होणार आहे. 


यानंतर दुसरी कसोटी सामना लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान घेण्यात येणार आहे. तिसरा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल येथे 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान लीड्स येथे आणि दुसरा सामना 2 ते 6 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. मालिकेचा पाचवा कसोटी सामना 10 सप्टेंबरपर्यंत मँचेस्टरमध्ये खेळला जाणार.