मुंबई : तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने प्रथम बॅटींग करत 7 विकेच गमावून 215 धावांचा डोंगर उभारला आहे. डेविड मलानच्या 77 आणि लियमच्या 42 धावांच्या तुफानी खेळीच्या बळावर इंग्लंडला इतकी धावसंख्या उभारता आली आहे. या धावसंख्येमुळे टीम इंडियासमोर 216 धावांचे आव्हान असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडने टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार इंग्लंडने चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत इंग्लंडला एकामागुन एक धक्के देण्यास सुरुवात केली. डेविड मलानने सर्वांधिक 77 धावा केल्या. यामध्ये त्याने 6 फोर आणि 5 सिक्स लगावले. त्यानंतर जेसन रॉय 27 धावा, बटलर 18, डेविड मलान 77, फिल 8, लियम 42 या धावांच्या बळावर 215 धावा गाठल्या. रवी विष्णोईने  आणि हर्षल पटेल 2 विकेट तर आवेश खान, उमरान मलिकने प्रत्येकी एक विकेट घेतला. 


दरम्यान आता टीम इंडिया 216धावा पुर्ण करते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. टीम इंडियाने या मालिकेत 2 सामने जिंतक आधीच मालिका जिकंली आहे. त्यात हा सामना जिंकून क्लीन स्वीपची टीम इंडियाला संधी आहे.