IND vs NZ 2nd ODI : भारत आणि न्यूझीलंडमधील दुसरा एकदिवसीय सामना उद्या म्हणजेच 21 जानेवारीला रायपूर येथे होणार आहे. पाहुण्या न्यूझीलंड संघासाठी हा सामना 'करो या मरो' असणार आहे. पहिला वनडे भारताने जरी जिंकला असला तरी सामना अटीतटीचा झालेला पाहायला मिळाला होता. न्यूझीलंडचा युवा खेळाडू मिचेल ब्रेसवेलने आक्रमक खेळी करत भारतीय गोलंदाजीतील हवा काढली होती. फक्त ब्रेसवेलच नाहीतर आणखी एका खेळाडूमुळे न्यूझीलंड संघाने मुसंडी मारली होती आणि टीम इंडिया पराभवाच्या सावटात सापडली होती.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमका कोण आहे तो खेळाडू? 
टीम इंडियाने दिलेल्या 350 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या आघाडीच्या फलंदाजांना भारतीन गोलंदाजांनी माघारी धाडलं होतं. यामध्ये कॉनवे, निकोलस, मिचेल, टॉम लॅथम आणि ग्लेन फिलिप्स हे स्वस्तात बाद झाले होते. मात्र त्यानंतर मिचेल सँटनर आणि मिचेल ब्रेसवेलने भारतीय गोलंदाजांना निशाण्यावर पकडत तोडफोड फलंदाजी केली. 


मिचेल ब्रेसवेल एकीकडून तुफान बॅटींग करत होता तर दुसरीकडे सँटनरनेही एक बाजू लावून धरली होती. दोघांनी अर्धशतके केलीत तेव्हा सामना पुर्ण न्यूझीलंडच्या पारड्यात झुकला होता. रोहितने सिराजला गोलंदाजीला बोलावलं आणि सँटनरची विकेट घेतली होती. ब्रेसवेलने आपलं आक्रमण चालू ठेवलं होतं. अखेरच्या षटकात ब्रेसवेल चुकला, शार्दुलच्या गोलंदाजीवर पायचीत आऊट झाला तेव्हा सामना भारताच्या पारड्यात झुकला आणि त्यानंतर अखेर शार्दुलने विजयावर शिक्कामोर्तब केलं. सँटनरने 57 तर मिचेल ब्रेसवेलने 140 धावा केल्या होत्या.


दरम्यान, मिचेल सँटनरने  फॉर्ममध्ये असणाऱ्या विराट कोहलीला बाद करत संघाला मोठा धक्का दिला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात सँटनरपासून सावध खेळ करत फलंदाजांनी धावा करायला हव्या. सँटनर न्यूझीलंडचा एक स्टार अष्टपैलू खेळाडू म्हणून समोर येताना दिसत आहे. 


भारतीय संघ : रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक