IND vs NZ 2nd T20: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळल्या जात आहे. मालिकेतील पहिला सामना पावसाने वाहून गेला होता. त्या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना हा सामना जिंकून मालिकेत अभेद्य आघाडी मिळवायची आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 49 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. त्याच्या शानदार फलंदाजीमुळे टीम इंडियाने (team India) न्यूझीलंडसमोर ठेवले 192 धावांचे आव्हान दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ 2nd T20:) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना माउंट माउंगानुई येथील बे ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान हार्दिक पांड्याकडे आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकानंतर दोन्ही संघ प्रथमच अ‍ॅक्शनमध्ये दिसणार आहेत.  20 ओव्हर्समध्ये भारताने 6 विकेट गमावून 191 धावा केल्या आहेत. सूर्यकुमारच्या शतकामुळे हे शक्य झालं.


वाचा: सूर्यकुमार यादवची तुफानी सेंच्युरी, टीम इंडियाने न्यूझीलंडला दिलं मोठं लक्ष्य 


त्याने 51 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या. यात 11 चौकार आणि 7 षटकार आहेत.  तर न्यूझीलंडचा गोलंदाज टिम साऊदीने हॅट्रिक घेतली. त्याने तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर हार्दिक पंड्या 13, दीपक हुड्डा आणि वॉशिंग्टन सुंदरला भोपळाही फोडू न देता तंबूत पाठवलं. सूर्यकुमार यादवला बॅटिंगची संधी मिळाली नाही. त्यामुळे भारताची धावसंख्या 200 पर्यंत पोहोचली नाही. टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 192 धावांच लक्ष्य दिलं आहे.