IND vs NZ Live Update : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळल्या जात आहे. पहिला सामना पावसाने खराब केला होता. त्या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही. मात्र आता न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारतीय संघ : इशान किशन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.
न्यूझीलंड संघ : फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, मिचेल सँटनर, इश सोधी, टिम साउदी, लॉकी फर्ग्युसन आणि अॅडम मिल्ने.
20 Nov 2022, 15:31 वाजता
IND vs NZ Live update : टीम इंडियाने न्य़ुझीलंडवर दणदणीत विजय मिळवला आहे. 65 धावांनी टीम इंडियाने हा सामना जिंकला आहे. या विजयानंतर टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
20 Nov 2022, 15:28 वाजता
IND vs NZ Live update : न्यूझीलंडला 48 चेंडूत 107 धावांची गरज आहे. तर टीम इंडियाला पाय रोवून उभा असलेल्या विलियम्सनला बाद करणे गरजेचे आहे.
20 Nov 2022, 15:16 वाजता
न्यूझीलंडला तिसरा धक्का बसला असून ग्लेन फिलिप्स 12 धावा करून बाद झाला. त्याला युजवेंद्र चहलने त्रिफळाचीत केले. न्यूझीलंड 75-3
20 Nov 2022, 15:08 वाजता
IND vs NZ Live update : न्यूझीलंडचा डावखुरा घातक गोलंदाज डेव्हॉन कॉनवे 25 धावा करून बाद झाला. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने त्याला अर्शदीपकरवी झेलबाद केले. न्यूझीलंड 63-2
20 Nov 2022, 14:50 वाजता
IND vs NZ Live update : भारतीय संघाने आतापर्यंतच्या या सामन्यात कसून गोलंदाजी केली आहे. पॉवर प्लेच्या चार षटकात चौकार-षटकार मारता आले नाहीत. न्यूझीलंड 30-1
20 Nov 2022, 14:30 वाजता
IND vs NZ Live update : न्यूझीलंड संघाला शून्यावर पहिला धक्का बसला. सलामीवीर फिन ऍलन भोपळाही न फोडता माघारी परतला.
20 Nov 2022, 14:13 वाजता
IND vs NZ Live update : सूर्याचं अवघ्या 49 चेंडूंत वादळी शतक, न्यूझीलंडला 192 धावांचं आव्हान
20 Nov 2022, 14:07 वाजता
IND vs NZ Live update : टीम इंडियाचा न्यूझीलंड दौऱ्यावरील कर्णधार हार्दिक पांड्या 13 धावा करून बाद झाला.
20 Nov 2022, 14:03 वाजता
IND vs NZ Live update : 18 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. भारताच्या 3 बाद 164 धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार यादव 45 चेंडूत 89 धावांवर खेळतोय.
20 Nov 2022, 14:00 वाजता
IND vs NZ Live update : सूर्यकुमार यादवच्या खेळात सातत्य कायम आहे. 2022 या वर्षात आतापर्यंतच्या खेळीत सूर्यकुमार यादवने त्याने 100 चौकार मारले. सूर्यकुमार यादवच शतक