IND VS NZ 2nd Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यात तीन सामन्यांची टेस्ट सीरिज सुरु असून यातील दुसरा सामना 24 ऑक्टोबर पासून पुण्यात खेळवला जात आहे. पहिल्या दिवसाअंती टीम इंडियाने (Team India) 1 विकेट गमावून 16 धावा केल्या होत्या तर न्यूझीलंड 246 धावांनी आघाडीवर होती. पुणे टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचे फलंदाज चांगली कामगिरी करून न्यूझीलंडची आघाडी मोडीत काढतील अशी अपेक्षा होती मात्र तसं झालं नाही आणि टीम इंडिया पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या गोलंदाजी समोर ऑल आउट झाली. 


टीम इंडियाची फ्लॉप खेळी : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे टेस्टच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाजांपैकी शुभमन गिल 30 धावा करून बाद झाला तर त्यानंतर आलेल्या विराट कोहलीला 9 बॉलचा सामना करून केवळ 1 धाव करणे शक्य झाले. त्यानंतर रवींद्र जडेजा वगळता इतर कोणताही फलंदाज मैदानात तग धरू शकला नाही. भारताकडून यशस्वी जयस्वाल 30, ऋषभ पंत 18, सरफराज खान 11, रवींद्र जडेजा 38 आणि वॉशिंग्टन सुंदर याने 18 धावा केल्या. तर इतर कोणालाही दोन अंकी धाव संख्या करणे देखील शक्य झाले नाही. त्यामुळे टीम इंडिया 156 धावांवर ऑल आउट झाली. 


मिचेल सँटनरने घेतल्या 7 विकेट्स : 


टीम इंडियाचा गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर याने पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या 7 विकेट्स घेऊन फलंदाजांना घाम फोडला होता. तर दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा गोलंदाज  मिचेल सँटनरने टीम इंडियाचा 7 विकेट्स घेऊन फलंदाजांना लोळवलं. मिचेल सँटनरने भारताच्या शुभमन गिल, विराट कोहली, सरफराज खान, रवींद्र जडेजा, आर अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह यांची विकेट घेतली.