कोलकाता | टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आज (21 नोव्हेंबर) टी 20 मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये पार पडणार आहे. टीम इंडियाने पहिले 2 सामने जिंकून मालिका खिशात घातली आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून क्लीन स्वीप करण्याची संधी आहे. भारताने मालिका जिंकल्याने या सामन्यात युवा खेळाडूंना संधी मिळणार असल्याचं म्हंटलं जात आहे. या सामन्यात फिरकीपटू युजवेंद्रला या सामन्यात संधी मिळाल्यास त्याला मोठी कामगिरी करण्याची संधी आहे. (ind vs nz 3rd t 2oi team india spinner yuzvendra chahal has need to 4 wickets for break jasprit bumrah most t 20i wickets record by indian bolwer)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युजवेंद्रला टीम इंडियाकडून टी 20 क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहचा सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. चहल या रेकॉर्डपासून अवघे 4 विकेट्स दूर आहे. या टी 20 मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. 


ताज्या आकडेवारीनुसार बुमराहने एकूण 55 टी 20 सामन्यात 66 विकेट्स घेतल्या आहेत. तर चहलने 49 सामन्यांमध्ये 63 विकेट्स घेतल्या आहेत.


चहलने या सामन्यात 4 विकेट्स घेतल्यास, तो बुमराहचा रेकॉर्ड ब्रेक करेल. यासह तो टीम इंडियाकडून टी 20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरेल. इतकंच नाही, तर चहल वेगवान सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय ठरेल. त्यामुळे या सामन्यात चहल हा रेकॉर्ड ब्रेक करतो का, याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.


टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, आवेश खान, ईशान खान आणि ऋतुराज गायकवाड. 


न्यूझीलंड क्रिकेट टीम | टीम साऊथी (कॅप्टन), टीम सायफर्ट (विकेटकीपर), मार्टिन गुप्टील, डेरेल मिचेल, ग्लेन फिलीप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, टोड एस्टेल, लॉकी फर्गुयसन, ट्रेन्ट बोल्ट, एडम मिल्ने, इश सोढी आणि जेम्स निशाम.