Ind vs NZ : टीम इंडियाच्या (Team India) भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा डाव 337 धावांवर ऑल आऊट झाला आहे. त्यामुळे पहिला वनडे सामना टीम इंडियाने 12 धावांनी जिंकला आहे. टीम इंडियाच्या विजयाच्या शिल्पकार मोहम्मद सिराज (Mohmmad Siraj) आणि शुभमन गिल (Shubman Gill) ठरला आहे. या विजयासह मालिकेत टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतलीय. 


हे ही वाचा : शुभमन गिलची बॅट तळपली, दिग्गज खेळाडूंना टाकले मागे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने न्यूझीलंडला (india vs new zealand) 350 धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या न्यूझीलंडची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण न्यूझीलंडचे सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले होते. फिन ए्ँलेन 40 तर डेवोन कॉन्वे 10 धावा करून आऊट झाला होता. यानंतर मैदानात उतरलेले इतर खेळाडू एकेरी दुहेरी धावसंख्या करून आऊट झाले होते. निकोलस 18, मिचेल 9, ट़ॉम लॅथम 24, ग्लेन फिलीप 11 धावा करून आऊट झाले होते. 


 


हे ही वाचा :  शुभमन गिलची डबल सेंच्यूरी, स्टेडीयममध्ये गुंजला 'सारा'चा गजर, VIDEO व्हायरल


 


मायकल ब्रेसवेल नाकात दम केला...


न्यूझीलंडचे एका मागून एक विकेट पडत असताना मायकल ब्रेसवेल (Michael Bracewell)मैदानात उतरला होता. मायकेल ब्रेसवेल आणि मिचेल सॅन्टनरने टीचून फलंदाजी केली. मायकल ब्रेसवेल 140 धावांची शतकी खेळी केली तर सॅन्टनरने अर्धशतक ठोकेले. या दोन्ही खेळाडूंनी न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा शेवटपर्यंच जिवंत ठेवल्या होत्या.तसेच टीम इंडियाच्या बॉलर्सच्या नाकात दम करून ठेवला होता. सामन्यात एक वेळ अशी होती ज्यावेळेस टीम इंडिया सहज विजय मिळवेल अशी आशा होती. मात्र ब्रेसवेलने सर्व आशांवर पाणी फेरले होते. ब्रेसवेलने (Michael Bracewell) टीम इंडियाच्य़ा हाता-तोंडाशी आलेला विजय हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा हा प्रयत्न अपयशी ठरला आणि टीम इंडियाने विजय  मिळवला. 


शेवटच्या ओव्हरचा थरार


अखेरच्या 10 बॉलवर न्यूझीलंडला 22 धावांची गरज होती. त्यानंतर 6 बॉलवर न्यूझीलंडला 20 धावा करायच्या होत्या. पहिला बॉल ब्रेसवेलने 95 मीटर सिक्स खेचला. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर शार्दुलने शतकवीर ब्रेसवेलची (Michael Bracewell) विकेट काढली. आणि सामना भारताच्या खिशात गेला. 


 


हे ही वाचा : रो'हिट' शर्मा! टीम इंडियाचा बनला नवीन 'सिक्सर किंग', 'हा' रेकॉर्ड ब्रेक


 


न्यूझीलंडसमोर 350 धावांचे आव्हान 


टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाकडून सर्वाधिक 208 धावा शुभमन गिलने (Shubman Gill)ठोकल्या होत्या. गिलला सोडून कोणत्याच खेळाडूला मोठी धावसंख्या करता आली नव्हती. त्यामुळे टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 350 धावांचे आव्हान ठेवले होते. 


दरम्यान टीम इंडियाने 350 सारखी डोंगराऐवढी धावसंख्या उभारून सुद्धा त्यांना विजय मिळवण्यासाठी खुप मशागत करावी लागली होती. कारण टीम इंडियाने न्यूझीलंडची अर्धी बॅटींग लाईनअप पव्हेलियन धाडली होती. त्यानुसार हत्ती गेला होता मात्र शेपटाने घाम काढला होता.न्यूझीलंडचा शेपूट ठरलेल्या ब्रेसवेल (Michael Bracewell) टीम इंडियाची अवस्था बिकट केली होती.मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये शार्दूलने त्याची विकेट घेऊन 12 धावांनी सामना जिंकला.दरम्यान आता तीन सामन्याच्या वनडे मालिकेत टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे.