रांची : दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 6 विकेट गमावून 278 धावा केल्या आहेत. रीझा हेंड्रिक्सच्या 74 आणि एडन मार्करमच्या 79 रन्सच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने इतक्या धावांचा डोंगर उभारला आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर 279 धावांचे आव्हान असणार आहे. आता ही धावसंख्या गाठत टीम इंडिया मालिकेत बरोबरी साधते की, दक्षिण आफ्रिका मालिका खिशात घालते, याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष लागले आहे.