IND VS SA 4th T20 : भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका (India VS South Africa) यांच्यात शुक्रवारी टी 20 सीरिजचा शेवटचा सामना पार पडला. वांडरर्स क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात टीम इंडियाने 135 धावांनी विजय मिळवला. यासह भारताने 4 सामन्यांची टी 20 सीरिज 3-1 अशी आघाडी घेऊन जिंकली. विजयानंतर खेळाडूंनी मैदानात मोठा जल्लोष केला मात्र यादरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) केलेल्या एका कृतीने चाहत्यांचं मन जिंकलं. सध्या या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


नेमकं काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात जेव्हा साऊथ आफ्रिकेच्या टीमची विकेट पडल्यावर टीम इंडियाचे खेळाडू जल्लोष करताना दिसले. यावेळी रिंकू सिंहने डोक्यात घातलेली कॅप जमिनीवर पडली आणि चुकून याच्यावर सूर्यकुमार यादवचा पाय पडला. हे कळताच सूर्याने ती कॅप उचलली आणि त्याला नमस्कार करून किस केले. सूर्यकुमारची ही कृती चाहत्यांना खूप आवडली. 


पाहा व्हिडीओ : 



टीम इंडियाने उभारला धावांचा डोंगर : 


वांडरर्स क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात सुरुवातीला कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी निवडली. यावेळी अभिषेक शर्माने 36 तर संजू सॅमसन आणि तिलक वर्माने नाबाद शतक ठोकली. संजूने ५६ बॉलमध्ये 109 तर तिलकने 47 बॉल 120 धावा केल्या. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 28४ धावांचे आव्हान दिले. त्यानंतर टीम इंडियाच्या बॉलिंग अटॅक समोर आफ्रिकेची टीम फार काळ टिकू शकली नाही. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या सर्व फलंदाजांना 18.2 ओव्हरमध्ये ऑल आउट केले. यात अर्शदीप सिंहने 3, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 तर रवी बिष्णोई, हार्दिक पंड्या आणि रमनदीप सिंह यांना प्रत्येकी एक व्हिडीओ घेण्यात यश आले. आफ्रिकेची टीम फक्त 148 धावा करू शकली.