IND vs SA: पहिल्या वनडेत टीम इंडियाचा पराभव; शिखर धववने `या` खेळाडूंवर फोडलं खापर
कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या शिखर धवनने सामन्यानंतर पराभवाचं कारण स्पष्ट केलंय.
मुंबई : मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 9 रन्सने पराभव केला. लखनऊमध्ये खेळला जाणारा हा पावसाचा खेळ 40-40 ओव्हरचा होता. दक्षिण आफ्रिकेने 40 ओव्हर्समध्ये 4 बाद 249 रन्स केले, त्यानंतर भारताला 8 गडी गमावून 240 रन्स करता आले. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीये. कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या शिखर धवनने सामन्यानंतर पराभवाचं कारण स्पष्ट केलंय.
पराभवानंतरही कर्णधार शिखर धवनने टीममधील खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. टीमच्या क्षेत्ररक्षणावरही त्याने निराशा व्यक्त केली. धवन म्हणाला, 'टीमने ज्या प्रकारे खेळ केला त्याचा मला खूप अभिमान आहे. आम्ही चांगली सुरुवात करू शकलो नाही, श्रेयस, सॅमसन आणि शार्दुल यांनी ज्या प्रकारे फलंदाजी केली, ती विलक्षण होती. आम्ही सुरुवातीला खूप रन्स गमावले. फिल्डींग फार चांगली नव्हती, पण आमच्यासाठी हा एक चांगला शिकण्याचा अनुभव होता."
शिखर धवनने टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय घेतला होता. सलामीवीर जानेमन मलान आणि क्विंटन डी कॉक यांनी 49 धावांची सलामी दिली. मलान बाद झाल्यानंतर आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाही बाद झाला त्यापाठोपाठ ऐडन माक्रमलाही कुलदीप यादवने शून्यावर बाद केलं.
डिकॉक 48 धावा बाद झाल्यानंतर क्लासेन आणि मिलर यांनी 134 धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर आफ्रिकेने भारतीय संघाला 250 धावांचं लक्ष्य होतं.
भारतीय संघाचीही सुरूवात खराब झाली, शिखर धवन आणि शुभमन गिल यांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. श्रेयस अय्यर 50 धावांवर बाद झाला. सामना हातातून निसटला असं वाटत होतं त्यावेळी शार्दुल ठाकूरने 5 चौकार लगावले आणि भारताच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र त्यानंतर शार्दुलही बाद झाला आणि भारताच्या विकेट्स जात राहिल्या. अखेरच्या ओव्हरमध्ये संजूने पूरेपूर प्रयत्न केले मात्र भारताचा 9 धावांनी विजय झाला. दक्षिण आफ्रिकेने विजयी सलामी दिली आहे.