मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात 12 मार्चपासून दुसरा कसोटी सामना (IND vs SL 2nd Test)  खेळवण्यात येणार आहे. या दुसऱ्या सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करणार असल्याचं म्हटलं जात आहे. रोहित या दुसऱ्या सामन्यात त्याच्यासोबत ओपनर बॅट्समन म्हणून 22 वर्षाच्या युवा खेळाडूला संधी देऊ शकतो. (ind vs sl 2nd test match team india captain rohit sharma might give chance to shubaman gill for opening at bengaluru)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित दुसऱ्या टेस्टसाठी मयंक अग्रवालला (Mayank Agarwal) विश्रांती देऊन त्याच्या जागी शुबमन गिलला (Shubaman Gill) खेळवू शकतो. रोहितने पहिल्या टेस्टमध्ये मयंकला संधी दिली. मात्र त्याला अपेक्षित सुरुवात देता आली नाही. मयंक 33 धावा करुन माघारी परतला. 


मयंककडून टीम इंडियाला आणि चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र मयंकला ते काही शक्य झालं नाही. त्यामुळे रोहित शुबमनला संधी देऊ शकतो.  


मयंकला ओपनिगंचा मोजकाच असा अनुभव आहे. मात्र त्याने ओपनर म्हणून अनेक सामन्यात निर्णायक आणि अपेक्षित कामगिरी केली आहे. शुबमनने अनेकदा टीम इंडियाचा विश्वास सार्थ ठरवला आहे. यामुळे रोहित शुबमनला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू शकतो.  


कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, आर अश्विन, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणिअक्षर पटेल.