श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत Ravindra Jadeja ला `डबल धमाल` करण्याची संधी
श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत (ind vs sl 2nd test) रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) एकासोबत 2 रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.
मुंबई : टीम इंडिया श्रीलंकेचा टी 20 मालिकेनंतर कसोटी मालिकेतही सूपडा साफ करण्याच्या हेतून मैदानात उतरेल. उभयसंघातील दुसऱ्या कसोटीला उद्यापासून (12 मार्च) सुरुवात होत आहे. या दुसऱ्या कसोटीत रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) एकासोबत 2 रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. जाडेजाने पहिल्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी केल्याने त्याच्याकडून आता अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. (ind vs sl 2nd test series team india all rounder ravindra jadeja have chance make 2 record break k l rahul b s chandrasekhar)
जडेजा 2 रेकॉर्ड ब्रेक करु शकतो. जडेजाने 58 टेस्टमध्ये 241 विकेट्स घेतल्या आहेत. जडेजाने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या कसोटीत 9 विकेट्स घेतल्या. आता दुसऱ्या कसोटीत जड्डूने आणखी 2 विकेट्स घेतल्या तर तो टीम इंडियाचा माजी गोलंदाज बीएस चंद्रशेखरला पछाडू शकतो.
जडेजा टीम इंडियाकडून सर्वाधिक टेस्ट विकेट्स बाबतीत बीएस चंद्रशेखरला मागे टाकू शकतो. चंद्रशेखरने 58 कसोटी सामन्यात 242 विकेट घेतल्या आहेत.
केएलला पछाडण्याची संधी
जडेजाकडे कसोटी सामन्यात 2 हजार 500 धावा पूर्ण करण्याचीही संधी आहे. जडेजाने आतापर्यंत खेळलेल्या 58 कसोटी सामन्यांमध्ये 2 हजार 370 धावा केल्या आहेत. जडेजाने यादरम्यान 2 शतकं आणि 17 अर्धशतकं केली आहेत. जडेजाने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये 175 धावांची नाबाद खेळी केली. आता जडेजा बंगळुरुतील दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाच्या केएल राहुलला पछाडू शकतो.
जडेजाला केएल राहुलच्या कसोटी धावांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. राहुलने 43 सामन्यात 2547 धावा केल्या आहेत. त्यामुळे जडेजाने 130 धावा केल्यास तो केएलला मागे टाकू शकतो.
कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, आर अश्विन, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणिअक्षर पटेल.