IND vs SL: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये टी-20 सिरीजनंतर आता वनडे सिरीजला (ODI series) सुरुवात होणार आहे. नव्या वर्षात 2023 मध्ये जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरूद्ध टीम इंडिया वनडे सिरीज खेळणार आहे. 3 सामन्यांची ही वनडे सिरीज खेळवली जाणार असून 10 जानेवारी रोजी पहिली वनडे होणार आहे. दरम्यान या वनडे सिरीजसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा टीमचं नेतृत्व करणार आहे.


रोहित शर्माचं (Rohit sharma) टीम इंडियामध्ये कमबॅक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय टीमचा नियमित कर्णधार रोहित शर्मा बांगादेशाविरूद्धच्या वनडे सिरीजमध्ये दुखापतग्रस्ती झाला होता. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाल्या कारणाने तो टीममधून बाहेर होता. मात्र आता तो पूर्णपणे फीट झाला असून नव्या वर्षात तो टीम इंडियामध्ये कमबॅक करणार आहे. 


बांगलादेशाविरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये रोहितने दुखापत असूनही चांगला खेळ केला. अंगठ्याला वेदना होत असताना देखील त्याने अर्धशतक झळकावलं. अशा परिस्थितीत चाहत्यांना त्याच्याकडून अनेक आशा आहेत.


वरिष्ठ खेळाडू वनडे सिरीडमध्ये सहभागी


2023 मध्ये भारतात आयसीसी वनडे वर्ल्डकपचं आयोजन होणार आहे. त्यासाठी टीम इंडियाने तयारीला सुरुवात केली आहे. याचमुळे आता भारताचे सर्व सिनियर खेळाडू वनडे फॉर्मेटमध्ये खेळताना दिसणार आहे. भारताची मुख्य टीम श्रीलकेविरूद्ध मैदानात उतरणार आहे.


कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली हे सर्व सिनियर खेळाडू श्रीलंकेविरूद्धच्या वनडे सिरीजमध्ये खेळताना दिसणार आहे. एशिया कप 2022 मध्ये दुखापतग्रस्त झालेला रविंद्र जडेजा देखील त्याच्या एक्शनमध्ये दिसून येणार आहे. दरम्यान या सिरीजमधून शिखर धवन आणि ऋषभ पंतला टीमबाहेर करण्यात आलं आहे. 


भारतीय टीमचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दीर्घकाळापासून खराब फीटनेसचा शिकार होता. दुखापतीमुळे त्याला एशिया कप आणि वर्ल्डकप 2022 मध्येही समाविष्ट करण्यात आलं नव्हतं. मात्र BCCI ने अचानक 3 जानेवारी रोजी मोठी घोषणा करत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला श्रीलंकेच्या वनडे सिरीजमध्ये समाविष्ट केलं.


IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध भारतीय टीमची वनडे स्क्वॉड


रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्याकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, वाशिंगटन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव , अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह