IND vs SL T20 : शनिवारी तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात भारताने श्रीलंकेचा 91 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने (IND vs SL) मालिका 2-1 ने जिंकली आहे. भारताने मालिकेतील पहिला सामना दोन धावांनी जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने दमदार पुनरागमन करत भारताचा 16 धावांनी पराभव केला. तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 228 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 16.4 षटकांत केवळ 137 धावाच करू शकला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यकुमारची शतकी खेळी


'मिस्टर 360' या नावाने प्रसिद्ध असलेल्या सूर्यकुमार यादवने (suryakumar yadav) या सामन्यातही आपली चमक दाखवली.  या सामन्यात सूर्यकुमार यादवे सर्वाधिक 112 धावा केल्या. त्याचवेळी राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 मध्ये शतक झळकावणारा सूर्या सामनावीर ठरला. त्याने 51 चेंडूत 7 चौकार आणि 9 षटकारांसह 112 धावांची खेळी केली. सूर्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे तिसरे शतक आहे.


गौतम गंभीरच्या ट्वीटने नवा वाद 


या दमदार खेळीनंतर सूर्यकुमार यादवर चौफेर कौतुकाचा वर्षाव होतोय. सर्वच आजी माजी खेळाडूंनी त्याचे अभिनंदर केलय. मात्र माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (gautam gambhir) याने सूर्याबाबत केलेल्या एका ट्वीटमुळे त्याच्यावर जोरदार टीका होतेय. सूर्याचे अभिनंदन करताना दिलेला सल्ला आता त्यालाच महागात पडताना दिसत आहे. गंभीरने आपल्या ट्विटमध्ये सूर्याला कसोटी संघात संधी देण्याबाबत भाष्य केले.


"किती शानदार खेळी आहे सूर्यकुमार यादव! त्याला कसोटी क्रिकेटमध्ये उतरवण्याची वेळ आली आहे!," असे ट्वीट गौतम गंभीरने केले आहे.




गौतम गंभीरच्या या ट्विटवर क्रिकेटप्रेमी संतापले आहेत. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला कसोटी संघात संधी का द्यायची, असा युक्तिवाद क्रिकेट चाहत्यांनी केला आहे. गंभीरच्या या ट्विटरवर नेटकऱ्यांनी सरफराज खानचे उदाहरण दिले. सरफराज  गेल्या काही काळापासून रणजी ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करत आहे, तरीही त्याला कसोटी संघात स्थान मिळालेले नाही. एका युजरने सर्व खेळाडू सर्वच फॉरमॅटमध्ये असण्याची गरज नाही. सूर्यकुमारला टी-20 स्पेशालिस्ट होऊ द्या, असेही म्हटलं आहे.