IND vs SL: श्रीलंका दौऱ्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी मोठी बातमी
टीम इंडियाचा श्रीलंका दौऱ्याचं कसं असणार शेड्युल वाचा सविस्तर
मुंबई: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची सीनियर म्हणजेच A टीम गेली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये टीम इंडियाची B टीम श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या टीमचं नेतृत्व शिखर धवन आणि भुवीच्या खांद्यावर देण्यात आलं आहे. या टीममधील खेळाडूंसाठी महत्त्वाची बातमी आहे.
श्रीलंका दौऱ्यावर जाण्याआधी सर्व खेळाडूंना मुंबईमध्ये क्वारंटाइन व्हावं लागणार आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी अनेक नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. श्रीलंका दौऱ्यावर जाण्याआधी संघातील सर्व खेळाडूंना मुंबईमध्ये एका सुरक्षित ठिकाणी क्वारंटाइन करण्यात येणार आहे. 14 जूनपासून हे खेळाडू 14 दिवस क्वारंटाइन असतील अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू 28 जून रोजी श्रीलंका दौऱ्यासाठी मुंबईतून रवाना होतील. त्याआधी कडक क्वारंटाइनमध्ये राहावं लागणार आहे. श्रीलंकेला पोहोचल्यानंतरही 3 दिवस कडक क्वारंटाइनमध्ये खेळाडूंना राहावं लागणार आहे. त्यानंतर ते सराव करू शकतात.
भारत विरुद्ध श्रीलंका 13, 16 आणि 18 जुलै दरम्यान वन डे सामने होणार आहेत. तर 21, 23 आणि 25 जुलै दरम्यान टी 20 सामने खेळवले जाणार आहेत. टी 20 सामने संध्याकाळी 7 वाजता तर वन डे सामने दुपारी 1.30 वाजता खेळवले जाणार आहेत. हे सामने संपल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू लगेच परतणार आहेत.
टीम इंडियाचं नेतृत्व शिखर धवन करणार आहे. भुवनेश्वर कुमार उपकर्णधार असणार आहे. पृथ्वी शॉ, पडिक्कल, आर गायकवाड, एस यादव, एम पांडे, हार्दिक पंड्या, नितीन राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, चहर, के गौथम, कृणाल पंड्या, के यादव, व्ही चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), डी चहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया यांची निवड करण्यात आली आहे.