लखनौ :  आज लखनौ येथे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा ट्वेंटी-20 सामना खेळला जाणार आहे. टीम इंडियाची पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात ११० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दमछाक झालीय. वेस्ट इंडिजच्या फास्ट बॉलर्सने भारताच्या आघाडीच्या बॅटसमनना झटपट बाद केलं होतं. त्यामुळे दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडिया चुका सुधारण्याच्या आटोकाट प्रयत्नात असेल हे नक्की.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखनौ येथील हे स्टेडियम, २४ वर्षानंतर तयार झालं आहे, येथील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे. ट्वेंटी-20 म्हटलं की बॅटसमनला हवीशी खेळपट्टी, असं एक समीकरण असतं. मात्र, बीसीसीआयचे प्रमुख क्युरेटर दलजीत सिंह यांनी सांगितलंय, लखनौच्या खेळपट्टीवर हे समीकरण नेमकं उलट असणार आहे. 


क्युरेटने यांनी यासोबत एक दावा देखील केला आहे, येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाच्या १३० धावाही प्रतिस्पर्धीसाठी डोकेदुखी ठरू शकतात. या खेळपट्टीवर गवत आहे आणि काही ठिकाणी तडेही गेलेत. त्यामुळे ही स्लो बाऊसिंग खेळपट्टी असेल आणि यावर आधीपासून स्पिनर्सना फायदा होण्याची शक्यता आहे.


क्युरेटर दलजीत सिंह यांना येथील पिच बनवण्याची जबाबदारी देण्यात दिली होती. त्यांच्यासोबत रवींद्र चौहान, शिव कुमार आणि सुरेंद्र यांचाही समावेश होता.